शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
मला लढा मान्य आहे अक्रोश व रडगाणे मान्य नाही असा स्वाभिमानी विचार सांगणारे जगद्वख्यिात साहित्यीक साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती तालुक्यातील उजेड येथे उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त शाळेत वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनंत जाधव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अण्णाभाऊंच्या साहित्याचे अभ्यासक प्रा.दयानंद कांबळे, प्रा.रामकिशन समुखराव व दशरथ सरवदे, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख तथा पब्लीक रिलेशन ऑफीसर महेश नाईकवाडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनिक एडले, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बालाजी शिंदे, इंदिरा गांधी शाळेचे मुख्याध्यापक वसंत किडीले, एम.एन बिरादार, मस्तान अली पटेल, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय बिराजदार, प्रकाश जाधव हे उपस्थित होते.
अण्णाभाऊंच्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून शालेय संयोजन समितीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लिंबाजी माध्यमिक विद्यालय, इंदिरा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यातून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन शाल पुष्पहाराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी अण्णाभाऊंच्या साहित्याचे अभ्यासक प्रा.दयानंद कांबळे, प्रा. रामकिशन समुखराव व दशरथ सरवदे यांनी अण्णाभाऊंच्या साहित्य विचारांवर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप ढोबळे यांनी केले. सुत्रसंचालन देवानंद कदम यांनी केले तर आभार उत्तम कदम यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप कदम, रामेश्वर कदम, शरद कदम, राम कदम, बब्रुवान कांबळे यांनी परिश्रम घेतले. यावेळी उजेड पंचक्रोशीतील सर्वधर्मीय नागरिक व समाज बांधवांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
















