शाळेत जेवणानंतर विद्यार्थ्यांना डुलकीची मुभा

टोकियो : वृत्तसंस्था
जपानमधील ‘इनेमुरी’ ही परंपरा म्हणजे एक खास प्रकारची मायक्रो-नॅप (थोड्या वेळेची झोप) आहे, जी मुलांना आराम मिळवून देण्यास मदत करते. जपानमध्ये चांगली झोप शरीर आणि मेंदूसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे अनेक शाळा, महाविद्यालये आणि अगदी कार्यालयांमध्येही कामाच्या दरम्यान थोडा वेळ विश्रांती घेणे किंवा डुलकी काढणे आवश्यक मानले जात आहे.

शाळेत चिमुकल्यांना अभ्यासादरम्यान खूप झोप येते. त्­यात ते बसूनच पेंगत असल्याचे अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहत असतो. मात्र यामुळे विद्यार्थ्यांसाठी झोप येऊनही अभ्यासाला बसणे किती कठीण असते हे समजून घेणे आवश्यक आहे. मात्र काही ठिकाणी शाळेचे नियम विद्यार्थ्यांसाठी चांगलेच पोषण बनवण्यात आले आहेत. प्रत्येक देशाची शिक्षणपद्धती वेगळी असते. काही देशांमधील शिक्षणव्यवस्था इतकी वेगळी आणि वैशिष्टयपूर्ण असते की त्याबद्दल ऐकून लोक आश्चर्यचकित होतात. काही शाळांमध्ये मुलांना जड दप्तर नेण्यास बंदी असते तर काही ठिकाणी लहानपणापासून शिस्त, आत्मनिर्भरता आणि उत्तम जीवनशैलीचे धडे दिले जातात. मात्र काही शाळांमध्ये दुपारच्या जेवणाच्या सुटीसोबत थोडा वेळ झोप घेण्याचीही मुभा दिली जाते.

जपानमध्ये झोप ही शरीर आणि मेंदूला ताजेतवाने ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. म्हणूनच अनेक शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांमध्ये दुपारच्या जेवणानंतर थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी खास वेळ दिला जातो. अहवालानुसार २० ते ४० मिनिटांची विश्रांती घेतल्यास मेंदू पुन्हा सक्रिय होतो आणि काम किंवा अभ्यास अधिक लक्षपूर्वक करता येतो. या पद्धतीला ‘इनेमुरी’ असे म्हटले जाते.

भारतात मानली जाते चुकीची सवय
भारतात जर एखादे मूल शाळेत झोपलेले आढळले, तर ती अतिशय चुकीची सवय मानली जाते. मात्र जपानमध्ये याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जाते. आता हा ट्रेंड इतर अनेक देशांमध्येही पसरत असून लोक त्याचे फायदे समजून घेऊन त्याला प्रोत्साहन देत आहेत.

किती वेळ झोप घ्यावी?
यासाठी कोणतीही ठरावीक मर्यादा नाही. प्रत्येक जण आपल्या गरजेनुसार डुलकी घेतो. एका अभ्यासानुसार, २५ मिनिटांची झोप घेतल्याने काम करण्याची क्षमता सुमारे ३४ टक्क्यांनी वाढते. तज्ज्ञांच्या मते, १० ते २५ मिनिटांची डुलकी सर्वाधिक फायदेशीर ठरत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|अण्णा हजारेंचा 90 वा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार
02:13
Video thumbnail
Latur|लातूरच्या नाट्यगृहाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर;अर्धवट नाट्यगृहाचे काम महिन्यांपासून ठप्प
04:14
Video thumbnail
शेकडो शेतकरी रस्त्यावर;महावितरणच्या अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिल्याने कासेगावचे आंदोलन तूर्तास मागे
00:37
Video thumbnail
Latur|MIDC मधील आग विझविण्यासाठी युद्धपातळीवरील प्रयत्न
04:07
Video thumbnail
Latur|साडेचार कोटींचे बसस्थानक तयार;तरी प्रवाशांना गळक्या शेडमध्येच थांबावे लागते!
01:22
Video thumbnail
Latur|वीज कोसळून बैल दगावला; शेतकरी दांपत्य स्वतःच ओढते नांगर#marathilivenews #maharashtranews
01:40
Video thumbnail
Latur|15 तास उलटले तरी आग विझेना; लातूर एमआयडीसीत अग्निशमन दलाची झुंज सुरू!
03:18
Video thumbnail
Nanded|नांदेड शहरातील प्री अक्षरा शाळेच्या गोडाऊनला आग;सुदैवाने जीवितहानी टळली
00:54
Video thumbnail
Latur Accident|दुचाकी स्लीप झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू; घटनेचा थरारक सीसीटीव्ही समोर
00:42
Video thumbnail
Latur Breaking|MIDC मधील नामांकित कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
02:07
Video thumbnail
Latur|लातूर एमआयडीसी मध्ये नामांकित कंपनीला भीषण आग; आगीत लाखोच साहित्य जळून खाक
00:15
Video thumbnail
बारामतीत सुनेत्रा पवारांचा 'राऊंड'; रुग्णालयातील अनागोंदी कारभारावरून कर्मचाऱ्यांची काढली खरडपट्टी!
00:57
Video thumbnail
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा हाहाकार! जोरदार धक्क्यांनी इमारती हादरल्या; पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO
01:12
Video thumbnail
सासू झाली नवरी अन् जावई झाला नवरा! उत्तर प्रदेशातील 'या' अनोख्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल
00:56
Video thumbnail
दिल्लीत जोरदार पाऊस आणि वादळ; ग्राउंड सपोर्ट उपकरणे आदळल्याने एअर इंडियाची ३ विमाने नुकसानग्रस्त
00:26

Latest news