लातूर : प्रतिनिधी
राज्यातील खाजगी साखर कारखानदारीत एफ. आर. पी. पेक्षा अधिक भाव ऊस पुरवठा शेतक-यांना देणा-या देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर अँड अलाईंड इंडस्ट्रीजला साईटवर वजन काटे यांची शासकीय अधिकारी यांच्यासह शेतकरी प्रतिनिधींनी संयुक्त पथकाद्वारे पाहणी केली तपासणी केल्यानंतर कारखान्यावर काटा योग्य व अचूक असल्याचा निष्कर्ष समितीने दिला आहे. त्यामुळे जागृति शुगरला अचूक काटे असल्याचे प्रशस्तीपत्र बहाल करण्यात आले आहे
सध्या जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्याकडे वजन काटे तपासणीसाठी भरारी पथकाची नियुक्ती केल्याने आज शुक्रवारी अचानक वजन करून व गव्हाणीकडेगे लेल्या वाहनांना परत बोलवून काट्याची तपासणी केली भरलेली व रिकामे केलेली वजन घेण्यात आले ते अचून असल्याचे त्यांनी सांगितले त्यानुसार जागृती शुगर म्हणजे प्रगती या ब्रीदवाक्य प्रमाणे उस उत्पादक शेतक-यांचा विकास, विश्वास या साखर कारखान्याने आपले वेगळेपण जपले आहे ते पुन्हा अधोरेखित झाले आहे राज्याचे माजी मंत्री जागृति शुगरचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव देशमुख, जागृति शुगरच्या अध्यक्षा तथा कार्यकारी संचालक सौ. गौरवीताई अतुलबाबा भोसले-देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, जागृति शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे यांच्या सूचनेनुसार कारखाना व्यवस्थापन नियोजन, पारदर्शकता ठेवून कार्य करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे
भरारी पथकात देवणीचे तहसीलदार सोमनाथ वाडकर वैद्यमापनशास्त्र निरीक्षक कांबळे एम. आर., लेखा परीक्षक श्रेणी २ आर. बी. पवार, पोलीस उपनिरीक्षक एस. जी. कोंडामंगले, कारखान्याचे सरव्यवस्थापक गणेश येवले, उपअभियंता अक्षय सूर्यवंशी, ऊस पुरवठा अधिकारी लक्ष्मण बिराजदार, प्रगतशील ऊस उत्पादक शेतकरी धनाजी जाधव, ऊस उत्पादक शेतकरी विष्णू निडवंचे, विजेंद्र कोटे, सहाय्यक केनयार्ड सुपर वायझर महेश काळे आदी उपस्थित होते.

