शासनाने केली बळीराजासाठी ऐतिहासिक कर्जमुक्ती 

चाकूर प्रतिनिधी
राज्यात बळीराजासाठी ऐतिहासिक कर्जमुक्ती शासनाने केली असून लातूर जिल्ह्यातील जवळपास ५४ हजार शेतक-यांची कर्जमुक्ती झाली असून उर्वरित शेतक-यांची सुद्धा कर्जमुक्ती लवकरच होणार आहे. स्व.अजित पवार हे कार्यकर्त्यांना बळ देणारे नेते होते. त्यांच्या आशीर्वादाने मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली असल्याचे प्रतिपादन सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.
रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.  प्रारंभी स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेस बाबासाहेब पाटील व मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. हे रक्तदान शिबीर चाकूर येथील जगत्जागृती विद्यामंदिरात चाकूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर आणि माऊली रक्तपेढी लातूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जगत जागृती शिक्षण संस्थेचे सचिव नरेश पाटील चाकूरकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, जिल्हा परिषद सदस्य भानुदास पोटे, जिल्हा परिषद सदस्या उषा सोनकांबळे, चाकूरचे नगराध्यक्ष भागवत फुले, उपनगराध्यक्ष साईप्रसाद हिपाळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजी काळे, पंचायत समितीचे उपसभापती भुजंग शिंदे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष सिद्धेश्वर अंकलकोटे, सर्वोत्तमराव कुलकर्णी, पद्माकर पाटील, बालाजी सूर्यवंशी, मच्छींद्र नागरगोजे, यशवंत जाधव, राहूल सुरवसे, गजानन होनराव, संतोष कलवले, सावित्रीबाई केदार, नगरसेवक मिलिंद महालिंगे, नगरसेवक मुज्जमील सय्यद, अरविंद बिरादार, नितीन रेड्डी, सरपंच डॉ.भालचंद्र चाटे, डॉ. नरेंद्र हाक्के, बालासाहेब जाधव, कॉमेश कसबे,वैभव पाटील, अ‍ॅड. विक्रम पाटील, वर्धमान कांबळे, इलियास सय्यद , शिवदर्शन स्वामी, राम कसबे, महंमद सय्यद, नरसिंग गोलावार,पपण कांबळे, संगमेश्वर लाटे,मूर्तजा सय्यद, अनिल वाडकर,गणपत कवठे,गणपत नितळे, वष्णिू तिकटे, संदीप शेटे, बिलाल पठाण, अ‍ॅड. श्रीनाथ सावंत, सुनील कांबळे, विश्वनाथ एडके, बाबू दापकेवाले, मधुकर मुंढे, डॉ. अब्दुल शेख, प्रा. दयानंद झांबरे, युवराज सूर्यवंशी, नितीन पाटील, विवेक शिंदे, विश्वनाथ पाटील, निलेश भंडे, उद्धव बिराजदार, आदित्य लवटे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, स्व.अजित पवार आपल्यात नसले तरी त्यांचे विचार-आचार आपण आत्मसात करून आपल्या नेत्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अधिक बळ देऊन राज्यास विकासाकडे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे.  रक्तदान हेच श्रेष्ठ दान या भावनेतून प्रत्येक कार्यकर्त्यांनी रक्तदान करून जयंती ऐतिहासिक पद्धतीने साजरी करावी असे त्यांनी सांगीतले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मधुकर कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चाकूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विविध सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिश्रम
घेतले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news