लातूर : प्रतिनिधी
एमएचटी-सीईटी (पीसीएम ग्रुप) परीक्षेच्या पहिल्या सत्राचा निकाल दि. १५ जून रोजी जाहीर झाला. त्यामध्ये येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा घवघवीत यश संपादन केले आहे. ३८ विद्यार्थ्यांनी ९९ पर्सेंटाईल पेक्षा जास्त गुण घेतले आहेत.
अमोल दत्तात्रय फड हा विद्यार्थी ९९.९९२९५७ पर्सेंटाईलसह महाविद्यालयातून सर्वप्रथम आला आहे. अंतरिक्ष बाळू जाधव ९९.९४३८७१५ पर्सेंटाईल मिळवून द्वितीय क्रमांकावर आहे. विनायक अरूण ब्याळे ९९.९१३९८२९ पर्सेंटाईल प्राप्त करून तृतीय क्रमांकावर आहे. तनिष्का उमेश इंगळे ९९.८१०२१३९ अनुसूचित जाती संवर्गातून प्रथम, कु. वेदिका मिलिंद जमादार ९८.७४७२२०९ पर्सेंटाईल गुणासह अनुसूचित जमाती संवर्गातून प्रथम आली आहे. दिव्यांग संवर्गातून हर्ष दिगंबर टाचले ८९.२३०३३७५ पर्सेंटाईल गुण प्राप्त केले आहेत. प्राप्त झालेल्या निकालानुसार एकूण ३८ विद्यार्थ्यांना ९९ पर्सेंटाईल पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व सीईटी-सेल शालेय समिती अध्यक्ष डॉ. अजय जाधव, सचिव बी. बी. ठोंबरे, सहसचिव डॉ. शिवाजीराव सुर्यवंशी, सहसचिव उद्धवराव पाटील व इतर सर्व संचालक, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, सीईटी-सेलचे संचालक प्रा. दिलीप देशमुख, उप-प्राचार्य सुरेश तांबडे, मुख्य-समन्वयक प्रा. स्वप्निल राजेमाने, व आयआयटी बॅचचे समन्वयक डॉ. अभयसिंह देशमुख, इतर सर्व समन्वयक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
















