Homeमहाराष्ट्रशाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सक्तीचे कायदे का?

शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सक्तीचे कायदे का?

कोश्यारींनी अपमान केला तेव्हा गप्प का होतात? : नाना पटोले यांचा संताप

मुंबई : प्रतिनिधी
सरकार धर्मस्वातंत्र्य विधेयक हे ताकदीच्या जोरावर लागू करू इच्छित आहे. महाराष्ट्रात दमणकारी व्यवस्था निर्माण करण्याचे काम फडणवीस सरकारकडून सुरू आहे. काही जातींना, काही धर्मांना टार्गेट करण्याचे काम सुरू केले आहे. शाहू-फुले आणि आंबेडकरांच्या महाराष्ट्रात असे कायदे कशासाठी असा सवाल काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी फडणवीस सरकारला केला आहे.

नाना पटोले म्हणाले की, भाजपच्या विचारसरणीच्या लोकांना काय वॉशिंग मशिनमध्ये धुण्यात येते का? बाहेरील कोश्यारींसारखे लोक महाराष्ट्रात राज्यपाल बनून येतात तेव्हा ते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दैवतांचा अपमान करण्यासाठी येतात का?

संविधानाने आम्हाला धर्मस्वातंत्र्य दिले आहे. शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे काम करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. पण यापूर्वी ज्यावेळी असे बिल थोपवण्यात आले त्याला जनतेतून विरोध करण्यात आला आहे. या बिलमधील ४-५ क्लॉजबद्दल या विधेयकाला विधिमंडळ समितीकडे पाठवावे अशी आमची मागणी होती. त्यातून चर्चा करत हे बिल एकमताने मंजूर करावे अशी आमची भूमिका होती. पण सरकारने दमणकारी व्यवस्था निर्माण करत काही जातींना, काही धर्मांना टार्गेट करण्याचे काम सुरू केले आहे. पाशवी बहुमताच्या आधारावर कायद्याच्या स्वरूपात हे जे सुरू आहे याचा आम्ही विरोध करतो.

नाना पटोले म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचे आम्ही समर्थन केले असे काही नाही. आव्हाडांनी त्या प्रकरणी माफी सुद्धा मागितली. विधानसभा अध्यक्षांनी त्यावर भूमिका स्पष्ट करत त्यांना ताकीद सुद्धा दिली आहे.

शिवसेना वेगळा पक्ष
शिवसेना या बिलाच्या ना सोबत होते ना बिलाच्या विरोधात होते, अशी त्यांची भूमिका होती. त्यांच्या भूमिकेवर आम्ही काही बोलू शकत नाही. त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांचे मत वेगळे असू शकत नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR