Homeलातूरशाहू महाविद्यालयाचे जेईई-अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी २०५ विद्यार्थी पात्र

शाहू महाविद्यालयाचे जेईई-अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी २०५ विद्यार्थी पात्र

लातूर : प्रतिनिधी
नॅशनल टेस्टींग एजन्सी (एनटीए) द्वारे घेण्यात आलेल्या जेईई-मेन-२०२६ परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत राजर्षी शाहू ज्युनिअर सायन्स कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. महाविद्यालयातील एकूण ४१२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी २०५ विद्यार्थी जेईई-ॅअ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी ठरले आहेत.
महाविद्यालयातील श्रवण दीपक बुलबुले हा विद्यार्थी (९९.८२२१९९) पर्सेंटाईल घेऊन महाविद्यालयातून सर्वप्रथम आला आहे. अंतरिक्ष बाळू जाधव (९९.७८०६९१) पर्सेंटाईल मिळवून महाविद्यालयातून सर्वद्वितीय, प्रणव परमेश्वर करडिले (९९.६७५८४८) सर्वतृतीय आणि सिद्धांत दत्तराव सुर्यवंशी (९९.६५५३३७०) पर्सेंटाईल मिळवून महाविद्यालयात ई.डब्ल्यु.एस. गटातून प्रथम क्रमांकावर आहे. तनिष्का उमेश इंगळे (९९.५९८५७४४) मुलीत महाविद्यालयातून व अनुसूचित जाती संवर्गातून प्रथम आली आहे. श्रीराम देविदास फुलसुरे (८७.३३७००१) अनुसूचित जमाती संवर्गातून प्रथम तर हर्ष दिगांबर टाचले (८३.७५८७४६) पर्सेंटाईलसह दिव्यांग गटातून महाविद्यायातून प्रथम आला आहे. भौतिकशास्त्र विषयात आर्यन ज्ञानोबा बोंडगे, उत्कर्ष गजानन कोठावळे, सूरज बिभीषण शेळके, हे तीनही विद्यार्थी १०० पर्सेंटाईल मिळवून देशात प्रथम आलेले आहेत.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अजय जाधव, सचिव बी. बी. ठोंबरे, सहसचिव डॉ. शिवाजीराव सुर्यवंशी, सहसचिव उद्धव पाटील, डॉ. पी. आर. देशमुख, प्राचार्य अनिरूद्ध जाधव, व इतर सर्व संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, प्रा. दिलीप देशमुख, प्रा. स्वप्निल राजेमाने, प्रा. सुरेश तांबडे व प्रा. अभयसिंह देशमुख, इतर सर्व समन्वयक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
फोटो: १६

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR