25.1 C
Latur
Saturday, December 6, 2025
Homeमहाराष्ट्रशिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट

शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट

राळेगणसिद्धी : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौ-यावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची त्यांच्या राळेगणसिद्धी या गावी जाऊन सदिच्छा भेट घेतली. अण्णांनी राळेगणसिद्धी येथे केलेले जलसंधारणाचे उत्कृष्ट काम संपूर्ण देशवासियांसाठी दिशादर्शक आहे. याच ठिकाणी आता बांबू लागवड अभियान हाती घेण्यात येणार असून, या कामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

अण्णा हजारे यांच्या भेटीबाबत सांगताना एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर म्हटले की, येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पूर्ण झाले असून, इतर अनुषंगिक कामे पूर्ण करण्यासंदर्भात मागणी करणारे निवेदन दिले. यासंदर्भात आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना फोन करून सदर काम स्वत: लक्ष घालून पूर्ण करण्याचे निर्देश दिले. राळेगणसिद्धी गावातील दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या शंभुराज मापारी याला डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने २५ हजारांचा धनादेश सुपुर्द करण्यात आला.

दरम्यान, राळेगणसिद्धी येथे येणा-या पर्यटकांना पद्मभूषण अण्णा हजारे यांचा जीवनपट ‘किसन हजारे ते अण्णा हजारे’ दाखवण्यासाठी केंद्र उभारण्याची मागणी केली. ही मागणीही तात्काळ पूर्ण करण्यासाठी पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांना सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR