27.2 C
Latur
Saturday, March 7, 2026
Homeमहाराष्ट्रशिक्षकांनीच विद्यार्थ्यांना पुरवली कॉपी!

शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना पुरवली कॉपी!

छत्रपती संभाजीनगरमधील घटना

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
बारावीच्या पहिल्याच इंग्रजी पेपरला सामूहिक कॉपी केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. बोर्डाने लावलेल्या सीसीटीव्हीसमोर बसूनच विद्यार्थ्यांनी कॉपी केली आहे. फक्त विद्यार्थीच नव्हे तर सामूहिक कॉपीमध्ये त्या परीक्षा केंद्रावरचे केंद्रप्रमुख, शिक्षक आणि कर्मचारी सहभागी होते. याप्रकरणी आता बोर्ड आणि शिक्षण विभागाने कठोर कारवाई सुरू केली आहे.

याप्रकरणी १९ कर्मचा-यांवर देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तर तपासणी केल्यानंतर विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी त्या केंद्रातील सर्वच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जप्त करण्यात आल्या आहेत. कास्टेडियन मार्फत या उत्तरपत्रिका मागवण्यात येणार असून त्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर करवाई करण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR