23.4 C
Latur
Sunday, March 8, 2026
Homeमहाराष्ट्रशिखर बँक घोटाळ््याचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला

शिखर बँक घोटाळ््याचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला

चौकशीला पूर्णविराम, सुनेत्रा पवारांसह ७० जणांना क्लिनचीट
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील राज्य सहकारी बँक म्हणजेच शिखर बँकेत हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप तत्कालीन विरोधी पक्षांकडून करण्यात आला होता. राज्यात भाजपचे सरकार पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर अजित पवार यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट समोर आला असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, दिवंगत नेते अजित पवार यांच्यासह ७० जणांना क्लीनचिट दिली. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळ््या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा मिळाला. आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयाने स्वीकारला.

राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर शिखर बँक घोटाळा प्रकरणी पहिला क्लोजर रिपोर्ट दाखल झाला होता. मात्र, शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच पुन्हा तपास करायचा आहे, असे मुंबई पोलिसांनी कोर्टात सांगितल होते. पण अजित पवार उपमुख्यमंत्री बनून शिंदे-फडणवीस महायुती सरकारसोबत येताच पोलिसांनी पुन्हा भूमिका बदलली. विधानसभा निवडणुकांच्या अगोदर पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी कोर्टात नव्याने अर्ज दाखल केला. शिखर बँक घोटाळा प्रकरणातील विरोध याचिका रद्द करण्याकरिता मुंबई पोलिसांनी कोर्टाकडे नव्याने अर्ज केला होता.

आता विशेष न्यायालयाने शिखर बँक घोटाळा प्रकरणी क्लोजर रिपोर्ट स्वीकारल्याने सुनेत्रा पवारांशी निगडित कंपनीसह दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उर्वरित ७० जणांना क्लीनचीट मिळाली. या क्लोजर रिपोर्ट विरोधात अण्णा हजारेंसह इतरांनी दाखल केलेल्या निषेध याचिकाही (प्रोटेस्ट पीटिशन) विशेष न्यायालयाने फेटाळल्या.

२५ हजार कोटींच्या
घोटाळ््याचा आरोप
२५ हजार कोटींच्या कथित शिखर बँक घोटाळ््या प्रकरणी २००२ ते २०१७ दरम्यान या साखर कारखान्यांनी कर्जफेड न केल्याने शिखर बँकेला २५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. कर्ज वसुलीच्या नावाखाली एमएससीबीने साखर कारखाने आणि त्यांची जमीन कवडीमोल भावात लिलावात विकली, हे बहुतांश व्यवहार बँकेचे प्रमुख असलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनाच करण्यात आले. त्यामुळे तत्कालीन विरोधक असलेल्या भाजपने हा मुद्दा घोटाळा म्हणून उपस्थित केला होता. आता या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR