अहमदपूर : प्रतिनिधी
या तालुक्यातील शिरूर ताजबंद बस स्थानक येथे २ कोटी १ लाख रुपयांच्या सिमेंट काँक्रीट व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाला. या कामाच्या माध्यमातून बसस्थानक अतिशय सुसज्ज आणि उत्तम दर्जाचे होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सुभाषराव पाटील हे होते. कार्यक्रमात साहेबराव जाधव, सभापती मंचकराव पाटील, माजी सभापती शिवाजीराव खांडेकर, माजी उपसभापती बाळासाहेब पाटील आंबेगावकर, आगार प्रमुख अमर पाटील, सरपंच मच्छींद्र वाघमारे, उपसरपंच सुरज पाटील, रणधीर पाटील, चेअरमन तुळशीराम भोसले, नामदेव विराळे, व्हाईस चेअरमन सुभाषराव गुंडरे, बालाजी गुंडरे, आशिष तोगरे, रामप्रसाद जाजू, गंगाधरराव ताडमे, बाळासाहेब बेडदे, शुभम सारोळे, बाबुराव उडतेवार, प्रा. द. मा. माने, बाबुराव सैदापुरे, शिवसांब स्वामी, बालाजी दमकोंडवार, सुभाषराव गुंडरे, फकीर अहमद बागवान, महबूब मुल्ला शेख, ईश्वर भुतडा, कोंडीबा पडोळे, शेखर मोरे, माधव सरवदे, श्रीधर पोतदार, शिवपा स्वामी, इब्राहिम पठाण, मल्लिकार्जुन स्वामी, चांद किनीवाले, पत्रकार राजकुमार सोमवंशी, बाबुराव श्रीमंगले, बालाजी पडोळे, सूर्यकांत चिगळे, अविनाश देशमुख, गजानन पवार, उद्धवराव भोसले, उमाकांत दावणगावे तसेच सूत्रसंचालक माधवराव माने आणि अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.