शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
शिरूर अनंतपाळ येथील रसिकता व सांस्कृतिक वैभवात भर पडत असून जिल्हा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून या लौकिकात भर पडेल असा आशावाद चौथ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष धनंजय गुडसूरकर यांनी व्यक्त केला. श्री अनंतपाळ नवयुवक वाचनालयाच्या वतीने घेण्यात येणा-या जिल्हा साहित्य संमेलनाच्या संदर्भाने आयोजित बैठकीत ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष एल.बी.आवाळे होते.या प्रसंगी प्रा. प्रविण जाहूरे,शिवाजी बिरादार, जेष्ठ शिक्षण तज्ञ प्रभाकरराव कुलकर्णी गुरुजी, डॉ.मन्मथ भातांब्रे, बालाजी येरोळे, शिवाजीराव मादलापूरे, विरभद्र भातांब्रे, शिवाजी एरंडे, गुरुनाथ शिंदाळकर,संजय उडीदे,वाचनालयाचे सचिव डॉ. राजकुमार बोपलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
नव्या पिढीला साहित्याची आवड निर्माण होण्यासाठी बालमेळावा, महिला साहित्य रसिकांचा सहभाग, वेळेचे नियोजन, याकडे लक्ष दिल्यास संमेलन वैशिष्ट्यपूर्ण व संस्मरणीय होईल, असे सांगून गुडसूरकर म्हणाले की, साहित्यातील नव्या अंकुराना प्रोत्साहन देण्यासाठी अग्रक्रमाने लक्ष देण्याची सूचना गुडसूरकर यांनी केली. यावेळी प्रा. प्रविण जाहूरे, शिवाजी बिरादार यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. या साहित्य संमेलनात सर्वांना सहभागी करून घेऊन संमेलन यशस्वी करू असे एल. बी. आवाळे अध्यक्षीय समारोपात म्हणाले. यावेळी वाचनालयाच्या उपाध्यक्ष सौ. सुनिता देवशटवार,सह सचिव उज्वला दुरुगकर, पद्ममा येलमवार,उज्वला लादे, शिवनंदा शिवने, बालाजी जाधव, उमाकांत शिंदाळकर, प्रा.कुमार बंडे, प्रा.देवदत्त मुंढे, गोविंद श्रीमंगले, धनाजी लखनगावे यांच्यासह महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. ग्रंथपाल काशिनाथ बोडके यांनी सुत्रसंचालन तर वाचनालयाचे सचिव डॉ. राजकुमार बोपलकर यांनी आभार मानले.

