33.5 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeलातूरशिरूर अनंतपाळ तालुक्यातील प्रकल्पांत अत्यल्प पाणीसाठा

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील प्रकल्पांत अत्यल्प पाणीसाठा

शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मध्यम व लघु प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असून त्यात सर्व प्रकल्पाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित केले असतानाही  रात्रीच्या वेळी सिंचनासाठी पाणी  उपसा होत असल्याने पिण्याच्या प्रश्न निर्माण झाला असून उन्हाळा आणखीन दोन महिने असल्याने तालुक्यातील सर्व गावांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून उन्हाळ्याचे आणखी दोन महिने याच प्रकल्पातील पाणी साठ्यावर नागरिकांना आपली तहान भागवावी लागणार आहे. सध्या प्रकल्पात अत्यल्प पाणी असल्याने शेतक-याांंनी तात्काळ प्रकल्पाचे पाणी सिंंचनासाठी बंद करून करणे व नागरिकांनी देखील काटकसरीने पाण्याचा वापर करणे गरजेचे आहे. दरम्यान यंदाच्या पावसाळ्याात तालुक्यात पिकापुरता रिमझिम पाऊस पडत गेला. त्यामुळे सिंंचन विहिरी व ंिवधन विहिरींचे पाणी पातळी वाढली नाही.
त्याचबरोबर घरणी, साकोळ मध्यम प्रकल्प तसेच पांढरवाडी पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस न झाल्याने प्रकल्पात पाणीसाठा झाला नाही. सध्या घरणी मध्यम प्रकल्पात फक्त ७.४७ टक्के, साकोळ मध्यम प्रकल्पात फक्त ११ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.  पांढरवाडी लघु प्रकल्पात मृत पाणीसाठा आहे. तालुक्यातील नदी, नाले तर जानेवारी मध्येच कोरडे झाले आहेत. त्यामुळे दुष्काळाची छाया गडद दिसत आहे. अशा परिस्थितीत व भविष्यात होणा-या पाणीटंचाईच्या अनुषंगाने जिल्हाधिका-याांंनी या प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित केले  आहे. मात्र जिल्हाधिका-याच्या आदेशाला न जुमानता या प्रकल्पातून सिंंंचनासाठी पाण्याचा उपसा केला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR