शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
मागील आठ दिवसापासून तालुक्यात अवकाळीचा तडाखा सुरूच असून या अवकाळी पावसाने आलेल्या पुरामुळे शहराजवळ असलेल्या फुलमळा ओढ्यावरील पुल वाहून गेल्याने या रस्त्यावरून वाहन जाणे बंद झाले असून या शिवारातील शेतक-यांना पुलावरून ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
शहराजवळून येरोळला जाणा-या भाग क्रमांक दोन रस्ता या रस्त्यावरील फुलमळ्याच्या ओढ्यावरील पुल पूर्णपणे खचून गेला आहे.या रस्त्याच्या शिवारात मोठ्या प्रमाणात शेती व शेती पूरक व्यवसाय असून पुलावरून शेतीकडे ये जा करणे शेतक-यांना कठीण झाले आहे. यांकडे प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी लक्ष देतील का अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.दरम्यान शिरूर अनंतपाळ शहरापासून मधल्या मार्ग येरोळ गावांकडे जाणारा निजामकालिन रस्ता आहे.
या भागातील शिवारात शिरूर अनंतपाळ येथील शेतक-यांच्या मोठ्या प्रमाणात शेती आहे. या भागातील शेतक-याकडे फळबाग व शेतीपूरक व्यवसाय असल्याने हा महत्वाचा रस्ता मानला जातो. मात्र तालुक्यात मागील आठ दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्यावरील फुलमळा ओढ्यावरील पुल खचला असून पुलाचा मोठा भाग वाहून गेल्याने सिमेंट पाईप उघडे पडले आहेत. या वरून ये-जा करणे कठीण झाले आहे. त्यामुळे दैनंदिन कामे करण्यासाठी शेतक-यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.