शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
तालुक्यातील वीज ग्राहक, विविध संघटना व नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला आहे. मागील तीन महिन्यापासून अवरेज बिल देऊन ग्राहकाची होणारे लूट थांबववी, यासह वीज संबंधी विविध मागणीचे निवेदन उपकार्यकारी अभियंता उपविभाग कार्यालय शिरूर अनंतपाळ यांना देण्यात आले आहे.
स्मार्ट-प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय थांबवावा,जे मीटर आधी झाले आहेत, त्यांचे परीक्षण करावे, चुकीचे आकारणी किंवा बिल वाढीचे प्रसंग तपासावेत, महावितरणने विद्युत पुरवठ्यात नियमितता, देखभालीचे काम वेळेवर करावेत, ग्राहकाच्या पसंतीनुसार मीटर बसवावे, तसेच गावठाण फिटर वेगळे केल्यामुळे ब-याच शेतक-यांचे घर व जनावराची गोठे शेतामध्ये आहेत. त्यामुळे शेतामध्ये लाईटची व्यवस्था करण्यात यावी यांसह विविध मागण्यांचा समावेश आहे. खाजगीकरणाचा विरोध,राज्यातील वीज वितरण सार्वजनिक/सरकारी नियंत्रणात राहावे.तसेच काही भागात मागण्यांबाबत महावितरणने आश्वासन दिले आहे. पण त्यानुसार काम होत नाही असा आरोप आहे. नागरिकांना दिलेल्या कालमर्यादेच्या आत समस्या सोडवली नाही तर तीव्र आंदोलन होईल असा इशारा मोर्चेक-यांनी दिला आहे.
या निवेदनावर शिवाजी पेठे बालाजी साकोळकर संदीप चौसष्ठे, भरत मुगळे, बाळासाहेब काळे, अब्दुल मुजेवार, संजय माळी, अनिल खंदारे, वसंत सूर्यवंशी, जगदीश जाधव, अक्षय पाटील, फारुख शेख, श्रीरंग पवार, एम एल शेख, संजीव शिंदे, नरसिंग शेंडगे, चंद्रकांत सांगवे, विजय चीटुपे, माधव गुडे, सिताराम पाटील, अॅड. पी आर पवार, उमेश मोरे, अनिल शिंदे, जगदीश सूर्यवंशी, बालाजी शिंदे, संजय शेरसांडे, सिद्धेश्वर डोंगरे, देवानंद बिरादार, विनायक बिरादार आदीच्या स्वाक्षरी आहेत.
















