23.1 C
Latur
Tuesday, July 8, 2025
Homeमुख्य बातम्याशिर्डीत साईभक्तांसाठी आता ‘ब्रेक दर्शन’ रांग! दर्शन रांग अव्याहतपणे सुरू राहणार

शिर्डीत साईभक्तांसाठी आता ‘ब्रेक दर्शन’ रांग! दर्शन रांग अव्याहतपणे सुरू राहणार

शिर्डी : प्रतिनिधी
साई मंदिरात महत्त्वाच्या व्यक्तींना दर्शन घेण्यासाठी दिवसभरात केव्हाही दर्शन रांग थांबवावी लागत होती. यामुळे दर्शन रांगेतील सामान्य भक्तांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याशिवाय सुरक्षा आणि इतर प्रशासकीय यंत्रणेवरही अतिरिक्त ताण येत होता. या पार्श्वभूमीवर संस्थानच्या तदर्थ समितीने व्हीआयपी दर्शनासाठी आता वेळा निश्चित केल्या आहेत. या ‘ब्रेक दर्शन’ व्यवस्थेमुळे दर्शन रांगेत ताटकळत रहावे लागणार नाही. साईसंस्थानच्या समितीने हा निर्णय घेतला.

व्हीआयपी आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींच्या दर्शनासाठी ‘ब्रेक दर्शन’ व्यवस्था सुरू केली आहे, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. जे भाविक झटपट दर्शनासाठी विनाशिफारस सशुल्क दर्शन पास काढतील, त्यांना पूर्वीप्रमाणे दर्शन कॉम्प्लेक्समधून स्वतंत्र रांगेतून मंदिरापर्यंत जाता येईल. मात्र, मंदिरात सामान्य भाविकाच्या रांगेतूनच त्यांना दर्शन मिळेल.

आरतीसाठीची सशुल्क व्यवस्था पूर्वीप्रमाणे असेल. समाधी मंदिरातील एका बाजूने ब्रेक दर्शनाची सोय केली जाईल. जेणेकरून सामान्य भक्तांची दर्शनरांग अव्याहतपणे सुरू राहील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR