27.6 C
Latur
Tuesday, March 10, 2026
Homeलातूरशिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या नूतन संचालक मंडळाने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची घेतली भेट

शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या नूतन संचालक मंडळाने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची घेतली भेट

लातूर : प्रतिनिधी
राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात  नावलौकिक मिळवलेल्या शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या नूतन संचालक मंडळांची नुकतीच निवड करण्यात आली आहे, नूतन कार्यकारणी व पदाधिका-यांनी आशियाना निवासस्थानी गुरुवारी प्रारंभापासूनचे संस्थेचे सन्माननीय सदस्य तथा राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांची सदीछा भेट घेतली.
यावेळी सर्व नूतन पदाधिकारी सदस्य यांचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी विविध विषयावर माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्यासोबत सकारात्मक चर्चा केली. नवीन कार्यकारी मंडळाने घटनेतील तरतुदी नुसार एकमताने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना सन्माननीय सदस्त्वाचे विनंतीपत्र दिले. त्याचा त्यांनी स्वीकार केला.
यावेळी शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष डॉ. अजय जाधव, सहसचिव डॉ. शिवाजीराव सुर्यवंशी, सहसचिव उद्धवराव पाटील, संचालक सच्चिदानंद पाटील, संचालक धर्मराज हल्लाळे, संचालक राजेंद्र मालपाणी, संचालिका श्रीमती पाटील विजया भुदेव, संचालक रावसाहेब कावळे, संचालक शिवाजी भोसले, संचालक शामराव पाटील, संचालक प्रकाश देशमुख, संचालक अमर देशमुख यांचे अभिनंदन करुन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी यावेळी  मार्गदर्शन केले.   यावेळी वैभव तळेकर, पल्लवी पाटील, बाजीराव शिंदे, सुरेश कावळे, दिपक पाटील आदींची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR