23.4 C
Latur
Sunday, March 8, 2026
Homeलातूरशिवजयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव, जिल्हाधिका-यांच्या हस्ते पाळणा

शिवजयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव, जिल्हाधिका-यांच्या हस्ते पाळणा

लातूर : प्रतिनिधी
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी छत्रपती  शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने  शिवजयंती विविध लोकोपयोगी कार्यक्रमाने साजरी होणार असून त्याची सुरुवात शनिवार दि. १४ फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबीराने होणार आहे.
राजर्षी शाहू महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना व सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती यांच्या वतीने चंद्रनगर परिसरात असलेल्या राजर्षी शाहू महाविद्यालयात हे शिबीर सकाळी ९ वाजता   सुरू होणार आहे. रविवार दि. १५ फेबु्रवारी रोजी विविध गटांत  बुध्दीबळ स्पर्धा घेण्यात येणार आहेत. विजेत्यांना रोख बक्षीस, प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्हाने गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश मोफत आहे. अष्टविनायक मंदिराशेजारी असलेल्या आर. एन. मोटेगावकर विद्यालयात या स्पर्धांना सकाळी १० वाजेपासून सुरुवात होईल. शिवजयंतीदिनी १९ फेब्रुवारी रोजी पाळणा महोत्सव साजरा होईल. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते व विविध महिला अधिकारी यांच्या उपस्थितीत रात्री १२ वाजता बाळ शिवबांचा पाळणा जोजावला जाईल.
तत्पूर्वी छत्रपती शिवरायांची थोरवी सांगणारा ‘आम्ही जिजाऊंच्या लेकी’ हा विशेष कार्यक्रम महिला शाहीर सादर करतील. यावेळी हजारोंच्या संख्येत महिला, विद्यार्थींनी व शिवप्रेमींची उपस्थिती राहील. रात्री १२ वाजता शिवरायांच्या जयजयकार करीत पेढे वाटून यावर्षीच्या जन्मोत्सवाची सांगता होईल. या सर्व कार्यक्रमांची जय्यत तयारी झाली असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR