22.6 C
Latur
Sunday, December 14, 2025
Homeमहाराष्ट्रशिवतीर्थावरील स्मृतिस्थळावर उद्धव ठाकरे, राज ठाकरे नतमस्तक

शिवतीर्थावरील स्मृतिस्थळावर उद्धव ठाकरे, राज ठाकरे नतमस्तक

हजारोंचा जनसमुदाय शिवतीर्थावर दाखल

मुंबई : प्रतिनिधी
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेराव्या स्मृतिदिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांनी शिवतिर्थावरील स्मृतिस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, आमदार सुनिल प्रभु, आमदार अनिल परब, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार बाळा नर, आमदार हारूण खान, सुरज चव्हाण, माजी आमदार प्रकाश फातर्पैकर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, विनोद घोसाळकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक-पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुखांचे विचार अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायक आहेत. शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना ज्वलंत विचार दिले. शिवसेनाप्रमुखांनी दिलेले हेच विचार घेऊन हजारोंचा जनसमुदाय शिवतीर्थावर दाखल झाला आणि स्मृतिस्थळावरील शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेसमोर पुष्पांजली अर्पण केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR