अहमदपूर : प्रतिनिधी
येथील शिवसेना पक्षाच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीच्या निमित्ताचे औचित्य साधून शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या वतीने एसटी बसस्थानक येथे येणा-या सर्व वारक-यांना शाबु खिचडी, केळी आदी फराळाचे वाटप करण्यात आले. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मागील ६ वर्षांपासून शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व आषाढी एकादशीचे औचित्य साधून दरवर्षी फराळाचे वाटप केले जाते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस २७ जुलै रोजी महाराष्ट्रभर उत्साहात साजरा केला जातो. त्याचाच भाग म्हणून उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व आषाढी एकादशीचे औचित्य साधून दरवर्षी एसटी बस स्थानकावर फराळाचे वाटप करण्यात येते.
हा उपक्रम शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या वतीने राबवला जाते. भाविक भक्तांना फराळाचे वाटप उपजिल्हाप्रमुख भारत सांगवीकर, नगरसेवक तथा क्रीडा व सांस्कृतिक मंडळ सभापती प्रतिक रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भारत सांगवीकर, तालुका प्रमुख दत्ता हेंगणे, तालुका संघटक तथा एस.टी. कामगार सेना प्रमुख मार्गदर्शक अनिकेत फुलारी, शहर प्रमुख शिवा कासले, नगरसेवक तथा क्रीडा व सांस्कृतिक मंडळ सभापती प्रतिक बालाजी रेड्डी, जेष्ठ शिवसैनिक माधव कासले, उपतालुका प्रमुख गणेश माने, संतोष आदटराव, उपशहर प्रमुख शिवा भारती, बाळासाहेब पडीले, गणेश राठोड, भगवान कदम, गजानन येन्ने, कालिदास धुळगुंडे, लहू वाळके, शंकर बने, सुभाष काशीकर, संतोष सूर्यवंशी यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.















