शिवाजीनगर तांडा, वाघमारी तांड्यासाठी टँकर मंजूर

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यामध्ये आता उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागलेल्या आहेत. यासोबतच पाणीटंचाईची तीव्रता देखील वाढू लागलेली आहे. जळकोट तालुक्यातील वाडी तांड्यावर दरवर्षीच मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होते. यावर्षी देखील एप्रिल महिन्यामध्ये तालुक्यातील शिवाजीनगर तांडा व वाघमारी तांडा येथे पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. या दोन्ही तांड्यावर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे जळकोट पंचायत समितीच्या वतीने टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. तहसील कार्यालयाने हा प्रस्ताव पुढे उपविभागी अधिकारी कार्यालय उदगीर येथे पाठवला. उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी या दोन्ही तांड्यावर टँकर सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे आता या दोन्ही तांड्यावर दोन दिवसात टँकरने पाणीपुरवठा होणार आहे.
जळकोट तालुक्यातील या दोन तांड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. शिवाजीनगर तांडा व वाघमारे तांडा या दोन ठिकाणी एका टँकर द्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. एकाच टँकरने दोन्ही तांड्यावर दोन टँकर ट्रिप पाणी टाकले जाणार आहेत. या टँकर साठी जळकोट तालुक्यातील चिंचोली येथील एका शेतक-याच्या बोरचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.  जळकोट तालुक्यामध्ये यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असे असताना देखील तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या पाणीटंचाईची भीती व्यक्त केली  जात आहे. तालुक्यामध्ये परतीचा  पाऊस म्हणावा तेवढा पडला नसल्यामुळे अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली.
जळकोट तालुक्यामध्ये काही गावे व वाडी तांडे असे आहेत की त्या ठिकाणी कितीही पाऊस पडला तरीही उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणीटंचाई जाणवतेच. जळकोट तालुक्यातील शिवाजीनगर तांडा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे यामुळे या ठिकाणी प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासोबतच वाघमारी तांडा येथे देखील पाणीटंचाई निर्माण झालेली आहे या ठिकाणी देखील टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जळकोट पंचायत समितीच्या प्रशासनाने घेतलेला आहे. तसा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो मंजुरीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय उदगीर प्रशासनाकडे आठ दिवसापूर्वी पाठविण्यात आला होता. या प्रस्तावास उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी मंजुरी दिली आहे.  या दोन्ही दांड्यावरील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत होती अखेर या दोन्ही तांड्यावर टँकर सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जळकोट तालुक्यामध्ये या उन्हाळयामध्ये पहिल्यांदाच टँकरद्वारे पाणीपुरवठा होणार आहे.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
'उद्योगाच्या जागेवर शिकवणीचे दुकान? गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याची इनसाईड स्टोरी!
10:52
Video thumbnail
डॉ. मनोज शिरूरे यांच्या अटकेनंतर CBI ची पुन्हा धाड; पथकाकडून घरच्यांची चौकशी, मोबाईल डेटा रडारवर
01:55
Video thumbnail
CBI च्या कारवाई दरम्यान मोठा खोळंबा, अधिकारी लिफ्टमध्ये अडकल्याने उडाली खळबळ
00:36
Video thumbnail
स्टेबल लाईनवरील रिकाम्या डब्याला आग; नांदेड रेल्वे प्रशासनाची तत्परता, मोठी दुर्घटना टळली
02:08
Video thumbnail
तेलंगणाच्या पोचमपाड धरणाचा नांदेडला फटका! ८ तालुक्यांतील पूरग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा
04:53
Video thumbnail
लातुरात प्रशासकीय सुस्तीविरोधात उद्रेक! भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू
05:16
Video thumbnail
लातुरात 'सीबीआय'चा तिसरा मोठा दणका! तीन तासांच्या चौकशीनंतर डॉ. मनोज शिरुरेंना पुण्यातून अटक
03:12
Video thumbnail
भटक्या कुत्र्यांच्या भीषण हल्ल्यात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांनी मांडला ठिय्या
02:39
Video thumbnail
लातूर उद्योग भवनमधील प्रा. शिवराज मोटेगावकरचे चार ते पाच प्लॉट्स वादाच्या भोवऱ्यात
03:58
Video thumbnail
धर्माबाद तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
01:59
Video thumbnail
धीरजभैय्या देशमुख यांच्या नेतृत्वात लातूरमध्ये क्रिकेटचा महाकुंभ; विलासराव देशमुख चॅम्पियनशिप २०२६..
02:56
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉक्टरांच्या मुलांसह मोटेगावकरांच्या मुलांसाठी खास क्लास ?CBI च्या चौकशीत उघड
01:49
Video thumbnail
BIG BREAKING : लातूरच्या नारायण नगर परिसरात CBI ची धडक;विद्यार्थ्याने नीट पेपर विकत घेतल्याचा संशय
01:48
Video thumbnail
टेंभुर्णीत भीषण आग! फर्निचर, हार्डवेअरसह इलेक्ट्रॉनिक्सची ३ दुकाने खाक; कोट्यवधींचे नुकसान
01:46
Video thumbnail
हिमायतनगर तालुक्यात पेट्रोल-डिझेलचा प्रचंड तुटवडा; शेतीची कामे रखडल्याने शेतकरी आक्रमक
03:18

Latest news