25.1 C
Latur
Saturday, December 6, 2025
Homeमहाराष्ट्रशीतल म्हात्रे महापालिकेची निवडणूक लढवणार?

शीतल म्हात्रे महापालिकेची निवडणूक लढवणार?

मुंबई : प्रतिनिधी
शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी दहिसरमधून २०१२ साली पहिल्यांदा नगरसेवकपदाची निवडणूक जिंकली. त्या आधी त्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी होत्या. शीतल म्हात्रे यांनी दोनवेळा नगरसेविका म्हणून काम केले. आताही त्यांना महापालिका निवडणुकीसाठी दहिसरमधून तिकिट मिळणार असल्याची चर्चा आहे. पण शीतल म्हात्रे ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाहीत. शीतल म्हात्रे यांनी पक्षश्रेष्ठींना आपली भूमिका कळवली आहे. वॉर्ड क्रमांक ८ मधून पक्ष ज्याला तिकिट देणार, त्याच्यासाठी काम करणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली आहे.

तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले. त्यावेळी सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेला चेहरा म्हणजे शीतल म्हात्रे. दहिसर विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक ८ च्या त्या नगरसेविका होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. २ डिसेंबरला नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. शीतल म्हात्रे यांचा नगरसेविका म्हणून काम करण्याचा अनुभव लक्षात घेता त्यांना महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी मिळेल असे बोलले जात आहे. पण शीतल म्हात्रे महापालिकेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत का? हा मुख्य मुद्दा आहे.

शीतल म्हात्रे यांचे नाव वादात सापडलेले
शीतल म्हात्रे या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत. दोनवेळा त्या प्रभाग समिती अध्यक्ष राहिल्या आहेत. एक आक्रमक नगरसेविका अशी त्यांची ओळख होती. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी बंड पुकारले होते. तेव्हा सुरुवातीला शीतल म्हात्रे यांनी त्याविरोधात आंदोलन केले होते. पण नंतर लगेच त्या एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR