शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या बळकटीकरणासाठी औसा येथे संयुक्त बैठक

औसा : प्रतिनिधी
इंडो सोया डेव्हलपमेंट असोसिएशन आणि महा मराठवाडा फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या सभासद शेतकरी उत्पादक कंपन्यांची संयुक्त बैठक दि. १ ऑगस्ट रोजी औसा येथील आमदार अभिमन्यू पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात उत्साहात पार पडली. बैठकीत शेतकरी उत्पादक कंपन्यांचे बळकटीकरण, सोयाबीन उत्पादनातील गुणवत्ता वाढ, बाजारपेठेतील नवीन संधी, शाश्वत शेती पद्धती तसेच शेतक-यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी परस्पर सहकार्य, सामूहिक नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणीवर विशेष भर देण्यात आला. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब, उत्पादन खर्चात बचत, दर्जेदार बियाणे व  कृषी निविष्ठांची उपलब्धता, मूल्यवर्धन, प्रक्रिया उद्योग, साठवण सुविधा आणि शेतमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.
तसेच सोयाबीन उत्पादक शेतक-यांना बदलत्या बाजारपेठेच्या गरजेनुसार मार्गदर्शन, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे नेटवर्क अधिक सक्षम करणे, विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ मिळवून देणे आणि कृषी क्षेत्रात नव्या संधी निर्माण करण्याबाबतही विचारमंथन झाले. संघटित प्रयत्नांच्या माध्यमातून शेतक-यांचे उत्पन्न वाढविणे, मूल्यसाखळी मजबूत करणे आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी सर्व संबंधितांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी इंडो सोया डेव्हलपमेंट असोसिएशन व महा मराठवाडा फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या वतीने कृषी व शेतकरी हिताच्या प्रश्नांसाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांचा श्रीकृष्णाची मूर्ती, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बैठकीस इंडो सोया डेव्हलपमेंट असोसिएशनचे संचालक महावीर कोचेट्टा व अनंत गायकवाड यांच्यासह जयप्रकाश शिंपी, समीर देशमुख, संजय कुलकर्णी, शैलेश कुमदाळे, गोविंद जाधव, दीपक देशमुख तसेच विविध शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news