शेतकरी चळवळीला विश्वासात घेत येणा-या हंगामाबाबत समन्वय बैठक

लातूर : प्रतिनिधी
मराठवाड्यात दरवर्षी सर्वाधिक भाव देण्याची परंपरा मांजरा साखर परिवाराने जपली आहे. कारखाना, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, उस तोड वाहतूकदार या सर्वांत समतोल राखण्याचे कसब  मांजरा साखर परिवाराचे  मार्गदर्शक माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख  यांच्यात आहे. सध्याची दुष्काळी परिस्थिती व गाळप हंगाम सुरू करण्याच्या दृष्टीने दि. ६ ऑक्टोबर रोजी  विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड विलासनगर येथे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना, मांजरा परिवारातील साखर कारखान्यांचे पदाधिकारी व कार्यकारी संचालक यांची समन्वय सभा संपन्न झाली.
सदर बैठकीस साखर संघाचे माजी उपाध्यक्ष तथा सदस्य आबासाहेब पाटील, विलास सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष वैजनाथ शिंदे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक आप्पा काळे, रेणा कारखान्याचे चेअरमन अनंतराव ठाकूर, उपाध्यक्ष प्रवीण पाटील, ट्वेंटी-वन शुगरचे उपाध्यक्ष विजयकुमार देशमुख, मारुती महाराज साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सचिन पाटील, मांजरा साखरच्या ऊस विकास कमिटीचे अध्यक्ष कैलास पाटील, मांजरा परिवारातील साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक पंडित देसाई, भीमराव मोरे, ए. जे. पाटील, सदाशिव बहिर, गणेश येवले, समीर सलगर, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजू कसबे, प्रदेश कार्याध्यक्ष सत्तार पटेल, जिल्हाध्यक्ष अरुण कुलकर्णी, नवनाथ आबाराव शिंदे, रामदास आबा गिरी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धर्मराज पाटील, माणिक गायकवाड, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, बालाजी जाधव, कालिदास बंडे, करण भोसले, महाराष्ट्र किसान आर्मी प्रमुख क्रांतिकारी संघटनेचे राम चलवाड, शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षचे कल्याण आप्पा हुर्दळे, तसेच लातूर जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांनी चालू गाळप हंगामामध्ये पाऊस नसल्याकारणाने कारखाने लवकर सुरू केल्यास सरासरी साखर उतारा कमी येणार असल्यामुळे व परिणामी उसाच्या भावावर परिणाम होत असल्यामुळे साखर कारखाने उशिराने चालू करावेत, अशी मागणी करण्यात आली तसेच पावसाअभावी ऊस उत्पादक शेतक-यांचे एकरी उत्पन्नात घट होणार आहे परंतु शेतक-यांनी जास्तीत जास्त उत्पन्न व्हावे या दृष्टीने जास्तीत जास्त खर्च ऊस उत्पादन घेण्यासाठी केलेला आहे त्याचा विचार करून गाळपास येणा-या उसास जास्तीत जास्त भाव ऊस उत्पादक शेतक-यांना देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
सदर प्रसंगी मांजरा परिवारातील पदाधिका-यांनी व कार्यकारी संचालक यांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांच्या सर्व शंकांचे निरासन केले तसेच साखर कारखान्यांच्या व ऊस उत्पादकांच्या विविध अडचणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली, साखरेची रटढ वाढवण्यात यावी, साखरेस व इथेनॉल व इतर बाय प्रॉडक्ट यांना निश्चित जास्तीत जास्त भाव देण्याबाबत केंद्र सरकारकडे विनंती करावी जेणेकरून ऊस उत्पादक शेतक-यांना जास्तीचा ऊस दर देणे शक्य होईल असा विचार मांडण्यात आला.
तसेच औद्योगिक साखर व घरगुती साखर दरामध्ये फरक ठेवून त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी केंद्र सरकारने करावी अशी मागणी केंद्र सरकारकडे करावी याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच सर्व शेतकरी संघटना यांच्याकडून येणा-या गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा याबाबत एकमुखी मागणी करण्यात आली, याबाबत मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगामामध्ये एफ. आर. पी. पेक्षा जास्तीचा दर ऊस उत्पादक शेतक-यांना दिला आहे या गाळप हंगामात ही तीच परंपरा कायम राखली जाईल असे आश्वासन देण्यात आले व खेळीमेळीच्या वातावरणात बैठक झाली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Air Pollution: दिवाळीच्या फटाक्यांमुळे लातूरचा AQI 414 वर
04:09
Video thumbnail
Nanded|आमदार श्रीजया चव्हाण यांनी ऊसतोड मजुरांसोबत साजरी केली दिवाळी
02:54
Video thumbnail
Nanded News: रील बनवण्याच्या नादात तीन एकर ऊस जळाला | फटाक्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
03:36
Video thumbnail
Latur|Latur|लातूरच्या उमंग ऑटिझम सेंटरला दीपशिखा देशमुख यांची भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद
01:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये फटाक्यांचा कहर? अबचलनगरमध्ये उभ्या कारला भीषण आग; कारचे मोठे नुकसान!
00:36
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये काळाचा घाला! जकणाळ तलावात पोहायला गेलेल्या २८ वर्षीय कामगाराचा बुडून मृत्यू
03:10
Video thumbnail
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या जागेचे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन
00:46
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|काँग्रेसच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट! अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल
02:24
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|पोलिसांनी दिलेला शब्द पाळला नाही? औराद पोलीस ठाण्यासमोर काँग्रेसचा ठिय्या
00:43
Video thumbnail
Nanded|नायगावमध्ये कापड दुकानाला भीषण आग! ३० लाखांचे नुकसान
01:25
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणूक | जिल्हा बँकेच्या विकासासाठी शेतकरी संघटना मैदानात
18:58
Video thumbnail
Nanded|करखेली तलावात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको! | चार गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर
01:40
Video thumbnail
Nanded|धर्माबादमध्ये उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा | आनंदराज आंबेडकरांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल
01:08
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये दिवाळीच्या रात्री ८ ठिकाणी आग! | ४० अग्निशमन जवानांचे शर्थीचे प्रयत्न
03:39
Video thumbnail
Latur Dcc Bank|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदारांची पळवापळवी? |काँग्रेसचे SP अमोल तांबे यांना निवेदन
02:18

Latest news