23.4 C
Latur
Tuesday, September 10, 2024
Homeलातूरशेतक-यांचे सुक्ष्म सिंचनाचे अनुदान थकले

शेतक-यांचे सुक्ष्म सिंचनाचे अनुदान थकले

लातूर : प्रतिनिधी
शेतक-यांनी बागायती व फळबाग पिकांना जगवण्यासाठी शेतात प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेतंर्गत अनुदानावर ठिबक, तुषार हे सुक्ष्म सिंचन घेतले. तुषार व ठिबक सिंचन लावून वर्ष झाले तरी जिल्हयातील ८ हजार २८५ शेतक-यांना १८ कोटी २२ लाख ७० हजार रूपयांचे अनुदान मिळाले नाही. त्यामुळे शेतक-यांच्या आर्थिक आडचणीत भर पडत आहे. सदर अनुदान केंव्हा मिळणार याची सतत विचारणा शेतक-यांकडून कृषि कार्यालयाकडे होत आहे.
शासनाने शेती सुजलाम सुफलाम करण्यासाठी व उत्पादन वाढीसाठी प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना कार्यान्वीत केली. त्याचा लाभही शेतकरी घेत आहेत. लातूर जिल्हयातील शेतक-यांनी २०२३-२४ मध्ये प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेतंर्गत अर्ज भरले होते. ठिबक, तुषार सिंचनाचा लाभ घेण्यासाठी २१ हजार ८९४ शेतक-यांची लॉटरीद्वारे निवड झाली होती. या योजनेसाठी ७ वर्षाच्या आत अर्ज करता येत नाही, कांही शेतक-यांनी दोन वेळेस ऑनलाईन अर्ज केले. त्यांचे अर्ज अपात्र करण्यात आले. तर जिल्हयातील ८ हजार २८५ शेतक-यांनी तुषार, ठिबक सिंचन शेतात अनुदानावर बसवले. या शेतक-यांना मार्च अखेर पर्यंत १८ कोटी २२ लाख ७० हजार रूपये अनुदान मिळणे आवश्यक होते. मात्र ते अद्याप मिळाले नाही.
प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेतंर्गत शेतक-यांना ठिबक, तुषार सिंचनासाठी शासनाचे ८० टक्के अनुदान व शेतक-यांचा २० टक्के हिस्सा आहे. शेतक-यांनी वर्षभरापूर्वी शेतात स्वखर्चातून ठिबक, तुषार सिंचन उभारले मात्र त्याचे अनुदान अद्याप मिळाले नसल्याने शेतक-यांची आर्थिक कोंडी होत आहे. येणा-या महिनाभरात विधान सभा निवडणूकीची आचार संहिता लागणार आहे. त्यामुळे विधान सभा निवडणूकीच्या पूर्वी अनुदान मिळावे अशी अपेक्षा शेतक-यांमधून व्यक्त होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR