शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
शहरात सततच्या पावसाने सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या बाबतीत कृषी विभाग व महसूल विभागाच्या वतीने शिरूर अनंतपाळ सज्जाचे तलाठी रामलिंग पाटील व कृषी सहाय्यक वर्षा भोग यांनी शेतक-यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करून पंचनामे केले. पंचनाम्याचा अहवाल प्रशासनाला कळवणार असल्याचे सांगितले. यावेळी महादेव आवाळे, सुचित लासूणे, गुंडेराव आवाळे गुरूजी, व्यंकट हांद्राळे, विनोद धुमाळे, सोमेश्वर तोंडारे, पिंटू गलबले, विश्वंभर लामतुरे, काशिनाथ अनकले, उदय बावगे, यश दुरूगकर, लाला मुजेवार, तानाजी वलांडे, खुर्शीद मुजेवार, जावेद तांबोळी आदी शेतकरी उपस्थित होते.