21.7 C
Latur
Wednesday, February 11, 2026
Homeमहाराष्ट्रशेतक-यांसाठी आनंदाची बातमी!

शेतक-यांसाठी आनंदाची बातमी!

फेब्रुवारी महिन्यात मिळणार २००० रुपये

मुंबई : प्रतिनिधी
शेतक-यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतक-यांना पुढच्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये २००० रुपये मिळणार आहेत. शेतक-यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. केंद्र सरकारसह राज्य सरकारने शेतक-यांसाठी अनेक योजन सुरू केल्या आहेत. यामध्ये आता योजनेचा हप्ता फेब्रुवारीमध्ये दिला असल्याचे समोर आले आहे.

केंद्र सरकारने शेतक-यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेत वर्षभरात ६००० रुपये दिले जातात. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. या योजनेतदेखील शेतक-यांना वर्षाला ६००० रुपये दिले जातात. या योजनेत प्रत्येकी २००० रुपये असे तीन हप्ते दिले जातात. या योजनेत आता शेतक-यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता पुढच्या महिन्यात मिळणार आहे.

राज्यातील ९१ लाख ९७ हजार शेतकरी या योजनेचा लाभ घेतात. या योजनेच्या पुढील हप्त्यासाठी कृषी विभागाने वित्त विभागाकडे १ हजार ९३० कोटी रुपयांचा निधी मागितला आहे. हा निधी मंजूर झाल्यानंतर शेतक-यांच्या खात्यात पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

पुढच्या महिन्यात म्हणजेच ५ फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीआधी शेतक-यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निधी मंजूर झाल्यानंतर सर्व लाभार्थी शेतक-यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR