शेतक-यास अश्रू अनावर झाल्याने मुख्यमंत्रीही भावूक

निलंगा : प्रतिनिधी
पावसाने पाठ फिरवल्याने शिवार करपले, सोयाबीन हातातून गेले आणि शेतक-यांच्या डोळ्यांत अश्रू आले. निलंगा तालुक्यातील जाऊ येथे बुधवारी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांच्या व्यथा प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. यावेळी त्यांनी ‘शेतक-यांना वा-यावर सोडणार नाही; शासन सरसकट मदत करणार आहे, अशी ग्वाही दिली.
दीर्घकाळ पावसाचा खंड पडल्याने सोयाबीनसह खरीप पिकांची झालेली दुरवस्था शेतक-यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्री स्वत: शेतात उतरले आणि हातात वाळलेली सोयाबीनची पिके घेऊन नुकसानीची पाहणी केली. पिकांची अवस्था पाहून शेतक-यांसमोरील आर्थिक संकटाची तीव्रता त्यांनी जाणून घेतली. जाऊ येथील शेतकरी नूर पटेल पिकांच्या नुकसानीची माहिती देताना भावूक झाले. महिला शेतकरी मंगलबाई कोयते यांनाही आपली व्यथा सांगताना अश्रू अनावर झाले. शेतक-यांच्या या व्यथा ऐकून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना धीर देत चिंता करू नका, सरकार आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा विश्वास दिला.पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप हंगाम हातातून निसटला असून नुकसानग्रस्त शेतक-यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी शासन आवश्यक कार्यवाही करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, खा. ओमराजे निंबाळकर, माजीमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, माजी मंत्री आ. संजय बनसोडे, आमदार बसवराज पाटील, युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, जिल्हा परिषद अध्यक्षा उषा पाटील यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
गतवर्षी अति पावसामुळे कापसाच्या वाती तर यावर्षी वाती साठी देखील कापूस नाही
02:01
Video thumbnail
Latur|अवैध सावकारीला लगाम घालण्यासाठी लातूर पोलिसांचे मोठे पाऊल!
03:48
Video thumbnail
Latur|१२ ऑक्टोबरला प्राध्यापकांचे राज्यव्यापी धरणे आंदोलन
06:43
Video thumbnail
Latur|विहिरीत मुबलक पाणी, पण नळ कोरडेच! जलजीवन योजनेचा उदगीरमध्ये बोजवारा?
04:19
Video thumbnail
Nanded|भाजपच्या साडी वाटप कार्यक्रमात गोंधळ! साड्यांसाठी महिलांची झटापट
01:01
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43
Video thumbnail
ज्या जनावरांनी शेतात साथ दिली, त्यांनाच विकायची वेळ; जळकोटमधील शेतकऱ्यांची व्यथा
02:30
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54

Latest news