चाकूर : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार, तसेच ग्रामविकासासाठी प्रयत्नशील राहणार, शेती विकास, आरोग्य, रस्ते आणि रोजगारासाठीचा अजेंडा तसेच थेट आश्वासन, गाव बदलण्यासाठी नियोजन करणार आणि तक्रारी नव्हे तर तोडगा काढणार, असे प्रतिपादन नागनाथ पाटील (एन.आर.) हे कॉर्नर बैठकांतून करीत आहेत.
जानवळ गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असून, काँग्रेस आघाडीकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक नागनाथ रामराव पाटील (एन.आर.) हे निवडणूक रिंगणात आहेत. य गटात काँग्रेस आघाडीकडून मतदारसंघात जोरदार संपर्क मोहीम सुरू केली आहे. शेती, जलसिंचन, आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी, महिला बालकल्याण व गावाच्या सर्वांगीण विकासा संबंधित अशा अनेक जनहिताच्या योजना जनतेपर्यंत पोहोचती करणार. या सर्व बाबतीत उत्कृष्टपणे काम करण्याची शंभर टक्के खात्री फक्त नागनाथ पाटील (एन आर पाटील) यांचीच आहे. कारण एन आर पाटील यांच्या आजपर्यंतच्या कामाचा आढावा घेतला तर खात्री पटते. अनेकांना त्यांनी लग्नकार्यासाठी ,मुलाच्या शिक्षणासाठी, दवाखान्यासाठी, शेतक-यांना शेती सिंचनासाठी तात्काळ जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून आर्थिक सहकार्य मिळवून दिले आहे.
शेतक-यांना ऊस कारखान्यावर नेण्यासाठी कितीतरी वणवण फिरावे लागते पण एन. आर. पाटील यांच्याकडे गेलेला कोणीही शेतकरी आनंदी होऊनच परतला आहे. एवढेच नाही तर कारखाना शेतक-यांकडून देयक कर्ज वजा करून उसाचे बिल देत असेल आणि कोणास हे अडचणीचे होत असेल तर अशा प्रसंगी संबंधीत शेतक-यांना दिलासा देण्याचे परोपकारी काम केले आहे हे एन. आर. पाटील यांचे वैशिष्ट्य आहे. हे कसल्याही प्रकारे भेदभाव करण्याचा त्यांचा स्वभाव नाही. त्यांची सामान्य लोकांत ‘कामाचा माणूस’ म्हणून ओळख आहे. एन आर पाटील यांना मत म्हणजेच विकासाला व अडचणीत धावून येणा-यास मत आहे.
आ. अमित देशमुख यांच्या सभेमुळे सकारात्मकता
स्टार प्रचारक माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांच्या प्रचाराचा सकारात्मक परिणाम झाला असल्याचे चित्र दिसत आहे. जानवळ येथे त्यांची जाहीर सभा नुकतीच झाली असून या सभेस झालेल्या गर्दीमुळे ही सभा विजयाचीच असल्याची चर्चा सध्या जोरदारपणे जानवळ गटात रंगली आहे.

