Homeलातूरशेती विकासासाठी शेत रस्ते दर्जेदार करा

शेती विकासासाठी शेत रस्ते दर्जेदार करा

लातूर : प्रतिनिधी
शेतीचा विकास आणि शेतक-यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणत्याही शेतक-याला शेत रस्त्यांची अडचण येऊ नये, यासाठी अधिका-यांनी अत्यंत दक्ष राहून ही मोहीम राबवावी, असे स्पष्ट निर्देश माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिले.
राज्याचे माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. २७ एप्रिल रोजी सकाळी लातूर शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजना लातूर शहर विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीची बैठक झाली. यावेळी लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे-विरोळे, लातूर पंचायत समितीचे सभापती श्रीकांत बैले, लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, लातूर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक साहेबराव नरवाडे, लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्याम गोडभरले, ट्वेन्टी-वन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, भूमीअभिलेख अधिकारी अशोकराव चव्हाण, वनपरीमंडळ अधिकारी लातूर निलेश बिराजदार, नायब तहसीलदार परमेश्वर कांबळे, नायब तहसीलदार सुधीर  देशमुख, सत्यनारायण पाटील, अक्षय देशमुख, सादुराम मस्के, शंकर कुलकर्णी, लक्ष्मण सपाटे, आनंद पाटील, लक्ष्मण मोरे, राहुल  पवार, सचिन सूर्यवंशी आदिसह संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी सर्व मंडळ अधिकारी उपस्थित होते. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते पाच प्रगतीशील शेतकरी सादुराम मस्के, शंकर कुलकर्णी, लक्ष्मण सपाटे, राहुल पवार, लक्ष्मण मोरे यांना मुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजना लातूर शहर विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल नियुक्ती पत्र देण्यात आले.  यावेळी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सर्व नियुक्त झालेल्या सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी उपविभागीय कार्यालयात प्रारंभी, मुख्यमंत्री बळीराजा शेत, पानंद रस्ते योजने अंतर्गत हाती घ्यावयाची कामे आणि सध्या सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. यानंतर बोलतांना ते म्हणाले, शेती विकास आणि शेतक-यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पानंद रस्त्यांच्या मजबुतीकरणाची मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे कोणत्याही शेतक-याला रस्त्याची अडचण येऊ नये यासाठी अधिका-यांनी अत्यंत दक्ष राहून ही मोहीम राबवावी. हाती घेतलेली कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, सर्व शेत, पानंद रस्त्यांची नोंद नकाशावर राहील हे पाहावे, या रस्त्यांचे सीमांकन करून घ्यावे, या सर्वच रस्त्यांना क्रमांक द्यावेत अशा सूचना या बैठकीदरम्यान दिल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR