34.2 C
Latur
Tuesday, March 10, 2026
Homeमनोरंजनश्रद्धा कपूर अंबाबाईच्या दर्शनाला

श्रद्धा कपूर अंबाबाईच्या दर्शनाला

कोल्हापूरमध्ये आगामी चित्रपटाचे शूटिंग

मुंबई : प्रतिनिधी
बॉलिवूडची सुपरस्टार श्रद्धा कपूर कायम आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. सध्या श्रद्धा तिचा आगामी चित्रपट ‘ईथा’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा एक बायोग्राफिकल चित्रपट आहे. यात श्रद्धा कपूरसोबत बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडा देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर करत आहेत. अशात आता श्रद्धा कपूर कोल्हापूरला स्पॉट झाली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा एक व्हीडीओ समोर आला आहे. श्रद्धा कपूर देवीच्या दर्शनाला थेट कोल्हापूरला पोहोचली आहे. श्रद्धा कपूरने कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले आहे. आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त ती कोल्हापूरला गेली आहे. तमाशा कलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच चित्रपटाचे शूटिंग सध्या कोल्हापूरमध्ये सुरू आहे.

श्रद्धा कपूरला पाहण्यासाठी चाहत्यांनी मंदिराबाहेर गर्दी केली. मंदिरात दर्शन घेताना श्रद्धा कपूरसोबत मराठी अभिनेता आनंद काळे देखील दिसला. आनंद काळे यांनी आजवर अनेक मराठी मालिका, चित्रपट यांमध्ये आपला दमदार अभिनय दाखवला आहे. श्रद्धा कपूर मंदिरात पारंपरिक ड्रेसमध्ये दिसली. तिने अंबाबाईची ओटी भरली आणि देवीचे आशीर्वाद घेतले.

‘ईथा’ चित्रपटात श्रद्धा कपूर विठाबाईंची भूमिका साकारणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ‘ईथा’ चित्रपट २०२७ ला रिलीज होणार आहे. चित्रपटाचे शूटिंग अंतिम टप्प्यात आहे. व्हीडीओवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. श्रद्धा कपूरचे साधे राहणीमान आणि प्रेमळ स्वभावाचे कौतुक होत आहे. चाहते आता ‘ईथा’ चित्रपटासाठी खूपच उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR