लातूर : प्रतिनिधी
बाभळगाव ग्रामपंचायतच्या स्व निधीतून दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते बाभळगाव येथील अपंगांना निधीचे वितरण करण्यात आले.
ग्रामपंचायतच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास बाभळगावचे माजी उपसरपंच गोविंद देशमुख, प्रशासक श्रीमती शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी शंकर भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते एकुण ८४ लाभार्थ्यांना १ लाख ७४ हजार ४०० रुपयांंचा निधी वितरीत करण्यात आला. सध्याच्या दुष्काळात बाळगाव ग्रामपंचायतने स्व निधीतून अपंगांना निधी उपलब्ध करुन दिल्याने अपंग लाभार्थ्यांमधून समााधन व्यक्त करण्यात आले.
















