लातूर : प्रतिनिधी
विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांना वाढदिवसानिमित्त नेटिझन्स मीडियाचे संचालक अजय बोराडे पाटील, त्यांच्या पत्नी रुपाली बोराडे पाटील, मुलगा अवनीश, मुलगी ओजस्वी यांनी बाभळगाव येथील त्यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख आणि श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांची सुंदर व आकर्षक फोटोफ्रेम त्यांना सप्रेम भेट देण्यात आली. या भेटीमुळे वाढदिवसाच्या शुभेच्छांसोबतच देशमुख परिवाराप्रती असलेला आदर, जिव्हाळा आणि आपुलकीची भावना व्यक्त झाली.
















