15.6 C
Latur
Monday, December 8, 2025
Homeलातूरश्रीमती वैशालीताई देशमुख यांचे महिला भगिनींकडून अभिनंदन 

श्रीमती वैशालीताई देशमुख यांचे महिला भगिनींकडून अभिनंदन 

लातूर : प्रतिनिधी
तालुक्यातील वैशालीनगर, निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांचा सोलापूर येथील इंचगिरी महाराज मठाच्या मठाधीश परमपूज्य साध्वी पुष्पलता पाटील महाराज यांच्याकडून आदर्श माता म्हणून  स्वयं लिखित भुरक्षायज्ञ पुस्तक देऊन गौरविण्यात आले. त्याबद्दल श्रीमती वैशालीताई देशमुख यांचे महिला भगिनींकडून अभिनंदन करण्यात आले.
लातूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुनीताताई अरळीकर, लातूर पंचायत समितीच्या माजी सभापती लताताई काटे, लातूर पंचायत समितीच्या माजी सभापती शितलताई  फुटाणे, छायाताई कापरे, श्रद्धाताई देशमुख, अनिताताई केंद्रे, अमृताताई देशमुख, वैशालीताई माने, वनिताताई बावणे, आशाताई शिंदे, ज्योतीताई शिंदे, सीमाताई  क्षीरसागर, शिवकन्याताई पिंपळे, आशाताई चव्हाण, मनीषाताई माने, सुमनताई लांडगे, विमलताई पाटील, सुवर्णाताई भिसे, अंजलीताई कानडे, दैवशालाताई राजमाने, पूजाताई इगे, लताताई देशमुख, रोहिणीताई शिंदे, उषाताई राठोड, दीपालीताई आदमाने, लताताई मुमाने, पल्लवीताई जाधव, आशाताई पाटील, जयश्रीताई राठोड, निर्मलाताई गायकवाड, यमुनाताई मस्के, मनीषाताई गायकवाड, ज्योतीताई नाडे, पूजाताई पाटील, स्नेहलता गुंठे आदी महिला भगिनींनी चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांचे अभिनंदन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR