22.2 C
Latur
Monday, January 12, 2026
Homeलातूरश्रीमती वैशालीताई देशमुख यांच्याकडून चाकूरकर कुटुंबीयांचे सांत्वन

श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्याकडून चाकूरकर कुटुंबीयांचे सांत्वन

लातूर : प्रतिनिधी
देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री, लोकसभेचे माजी सभापती शिवराज पाटील चाकूरकर यांचे नुकतेच निधन झाले. विलास सहकारी  साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी दि. १८ डिसेंबर रोजी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या ‘देवघर’ निवासस्थानी जाऊन चाकूरकर कुटुंबीयांचे सांत्वन  केले.
‘देवघर’ निवासस्थानी गेल्यानंतर श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी शैलेश पाटील चाकूरकर,  डॉ. अर्चनाताई पाटील  चाकूरकर यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.  यावेळी लातूर शहराच्या माजी महापौर प्रा. डॉ. स्मिताताई खानापुरे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ. सपनाताई किसवे यांची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR