27.6 C
Latur
Tuesday, March 10, 2026
Homeलातूरश्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते दुल्हनिया कलेक्शनचा शानदार शुभारंभ

श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते दुल्हनिया कलेक्शनचा शानदार शुभारंभ

लातूर : प्रतिनिधी
डी. सी. क्लब, लातूर यांच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या अंबाजोगाई रोडवरील दुल्हनिया कलेक्शनचा शानदार शुभारंभ विकास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाला.
यावेळी लातूर महानगर पालिकेच्या महापौर जयश्री सोनकांबळे, औसा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष परवीन शेख, संगीता मोळवणे, नगरसेविका कौसर शेख, इसरार सगरे, गणपत बाजूळगे, रूकसार पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.  या उद्घाटन प्रसंगी श्रीमती वैशालीताई देशमुख म्हणाल्या की, जे जे नवे ते ते लातूरला हवे या प्रमाणे लातूरला दुल्हनिया कलेक्शनचे शासनदार उद्घाटन झाले आहे. लातूरच्या नागरीकांना लग्नाचे कपडे खरेदी करण्यासाठी आता पुणे, मुंबई येथे जाण्याची गरज नाही. कारण लातूर येथे दुल्हनिया कलेक्शन सुरू झाल्याने वेगवेगळया डिझाईनचे कपडे येथे उपलब्ध झाले आहेत. या नविन शोरूमला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी लातूर महानगर पालिकेच्या महापौरे जयश्री सोनकांबळे, औसा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष परवीन शेख, संगीता मोळवणे यांनी या नव्या दुल्हनिया कलेक्शनला शुभेच्छा दिल्या. यावेळी सलाउद्दीन काझी, मुकमअली सय्यद, आरीक मोमीन, सोहेल काझी, मुजाहेद पटेल, काशीक काझी, जमशेद शेख, समीउल्ला हश्मी, खुमरूद्दीन बार्शीकर, कदीर खान, इस्माईल शेख आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR