श्री संत गोविंद माऊली मंदिरात हजारो भाविकांची गर्दी

जळकोट   : प्रतिनिधी
आषाढी एकादशीनिमित्त जळकोट तालुक्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांवर भक्तांचा मोठा जनसागर उसळला. प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणा-या वांजरवाडा येथील श्री संत गोविंद माऊली मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मंदिरापासून सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत दर्शनाची रांग लागली होती. दर्शनासाठी दोन ते तीन तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र दिवसभर पाहायला मिळाले.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, भजन-कीर्तन व नामस्मरणाचे आयोजन करण्यात आले होते. दापका येथील संत नामदेव महाराज दापकेकर यांच्या दिंडीचेही वांजरवाडा येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. जळकोट, कंधार, मुखेड,अहमदपूर तसेच परिसरातील विविध गावांतील हजारो वारकरी व भाविकांनी श्री संत गोविंद माऊलींचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. मंदिर देवस्थान समिती व ग्रामस्थांच्या वतीने भाविकांसाठी चहा व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
जळकोट तालुक्यातील विराळ येथील प्रसिद्ध श्री धोंडूतात्या देवस्थानात येथेही हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. करंजी, कुणकी, जळकोट, कोळनूर, माळहिप्परगा, लाळी, सोनवळा तसेच तालुक्यातील अनेक गावांतील भक्तांनी मंदिरात दर्शन घेऊन धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदविला. देवस्थान समितीच्या वतीने उपवास करणा-या भाविकांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. दिवसभर भक्तीमय वातावरणात भजन, नामस्मरण व धार्मिक कार्यक्रम पार पडले. आषाढी एकादशीच्या पावन पर्वामुळे वांजरवाडा आणि विराळ या दोन्ही देवस्थानांमध्ये भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news