परभणी : परभणी येथील श्री साई भक्त सेवा मंडळ आयोजित आणि श्री साईबाबा जन्मस्थान पाथरी येथील मंदिरातून निघालेल्या श्री साईबाबा यांच्या पादुकांचे परभणी शहरात आगमन झाले आहे.
या पादुकांचे गुरूवार, दि.२५ डिसेंबर रोजी योगक्षेम कॉलनी येथील करसल्लागार राजकुमार भांबरे यांच्या शंकर-पार्वती निवासस्थानी आगमन झाले. यावेळी श्री साईबाबा यांच्या पादुकांचे पुजन भांबरे परीवाराचे जावई तुकारामजी दळवे, सौ. इंदुताई दळवे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्री साईबाबांच्या पादुका, पालखीचे हजारों भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी उपस्थित भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी शंकरराव भांबरे, कर सल्लागार राजकुमार भांबरे, अॅड. संजय भांबरे, ज्ञानोबा शिंदे, सुरेश चव्हाण, नागेंद्र अनंतवाल, बापुराव सुर्यवंशी आदी साईभक्त उपस्थित होते.

