27.2 C
Latur
Saturday, March 7, 2026
Homeलातूरश्री सिध्देश्वर यात्रेनिमित्त मंदिर परिसरात वाहतूक तात्पुरती बंद

श्री सिध्देश्वर यात्रेनिमित्त मंदिर परिसरात वाहतूक तात्पुरती बंद

लातूर : प्रतिनिधी
ग्रामदैवत श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर देवालयाच्या ७३  व्या महाशिवरात्री यात्रेनिमित्त मंदीर परिसरातील काही रोडवरील वाहतूक तात्पूरत्या स्वरुपात बंद करण्यात आली आहे.  लोकांच्या दळणवळणानिमित्त त्यांना विविक्षीत ठिकाणी पोहचणेसाठी सदरची अडचण लक्षात घेता दि. १५ फेबु्रवारी रोजीचे ००.०१ ते यात्रा संपेपर्यंत रिंग रोड मार्गे मळवटी चौकाकडून मंदिर परिसरात यात्रेकडे येणारे सर्व वाहने (दुचाकी वगळून) हे मळवटी चौकापर्यंत येतील तेथून पुढे येण्यासाठी प्रतिबंध करावा, महात्मा गांधी चौक, हत्ते कॉर्नर, सिध्देश्वर चौक मार्गे मंदिर परिसरात यात्रेकडे येणारे सर्व वाहने (दुचाकी वगळून) हे सिध्देश्वर चौकापर्यंतच येतील तेथून पुढे येण्यासाठी प्रतिबंध करावा.
राजर्षी छत्रपती शाहु महाराज चौकाकडून ६० फुटी रोड, अब्दुल कलाम चौक मार्गे मंदिर परिसरात यात्रेकडे येणारे सर्व वाहने (दुचाकी वगळून) हे अब्दुल कलाम चौकापर्यंतच येतील तेथून पुढे येण्यासाठी प्रतिबंध करावा, बरकतनगरकडून मंदिर परिसरात यात्रेकडे येणारे सर्व वाहने (दुचाकी वगळून) हे बरकतनगर कॉर्नर पर्यंतच येतील तेथून पुढे येण्यासाठी प्रतिबंध करावा, तरी सर्व नागरीकांनी उक्­त आदेशाप्रमाणे वाहतुकीसाठी बंद असल्­याचे घोषित करण्­यात आलेल्­या मार्गाचा वापर न करता पर्यायी मार्गाचा वापर करुन महानगरपालिका व पोलिस प्रशासनास सहकार्य करावे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR