लातूर : प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद लातूर महानगर शाखेच्या वतीने यंदाचा रंगकर्मी स्व. बंकट पुरी स्मृती पुरस्कार अभिनेते संकर्षण क-हाडे, रंगमंचीय गौरव पुरस्कार सिने व नाट्य अभिनेत्री निलम शिर्के-सामंत तर होतकरु रंगकर्मीला दिल्या जाणा-या स्व. विजयकुमार धायगुडे रंगकर्मी पुरस्कार प्रदीप भोकरे यांना जाहीर करण्यात आला आहे.
सदर पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ अभिनेते मिलिंद शिंदे व लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या हस्ते दि. २० मे रोजी सायंकाळी ५ वाजता भालचंद्र ब्लड बँक, सभागृहात होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्या रंगकर्मींनी उपस्थित राहावे, असे आवाहन नाट्यपरिषद लातूर महानगर शाखेचे अध्यक्ष ऍड. शैलेश गोजमगुंडे, कार्याध्यक्ष डॉ. दीपक वेदपाठक, उपाध्यक्षा अर्चना पोपडे, कोषाध्यक्ष अनिल पुरी, सहकार्यवाह नागेश जाधव, कार्यकारिणी सदस्य रवि आघाव, रुपेश सूर्यवंशी, अश्विनी धायगुडे-कोळेकर, बालरंगभूमी परिषद, लातूर शाखेचे अध्यक्ष रणजित आचार्य, वसुधा पाटील, भीम दुनगावे आदींनी केले आहे.
















