लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिदेच्या विविध विभागात कार्यरत अधिकारी बदल्या होऊन त्या-त्या जिल्हयात कार्यरत होऊन दीड ते दोन वर्षाचा कालावधी लोटला तरी त्यांची नावे लातूर जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर झळत असल्याची वृत्त दैनिक एकमत ने शुक्रवार दि. १२ जून रोजी प्रकाशीत होताच जि. प. प्रशासन खडबडून जागे झाले. जि. प. प्रशासनाने तात्काळ कार्यरत अधिका-यांची यादी अद्यावत केली आहे. या अद्यावत बदलाचा फायदा नागरीकांना होणार आहे.
लातूर जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर विविध विभागांची माहिती अपलोड करण्यात येत असते. यामध्ये विभागाच्या माहिती मध्ये काणाचे कोण विभागवार या मध्ये लातूर जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या अधिका-यांची यादी गेल्या एक ते दिड वर्षापासून अपलोड करण्याचा विसर लातूर जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाला प्रशासक राज मुळे पडला होता. जिल्हा परिषदेतून बदली अथवा सेवा निवृत्त होणा-या अधिका-यांचे नाव वगळून नविन पदभार घेणा-या अधिका-यांचे नाव बदलने अपेक्षित असताना या कामाकडे दुर्लक्ष झाल्याने जिल्हा परिषदेतंर्गत व पंचायत समित्या अंतर्गत कार्यरत अधिका-यांची नावे अपलोड करणे दूरच राहिले. या संदर्भाने दैनिक एकमत मधून शुक्रवार दि. १२ जून रोजी वृत्त प्रकाशीत होताच जि. प. प्रशासने तात्काळ लातूर जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ अद्यावत केले आहे.
















