बाभळगाव : प्रतिनिधी
येथील दयानंद विद्यालयाच्या शिक्षिका संगीता संदिपान गोमारे यांना राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिल्या जाणा-या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार दि. ५ जून रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी माजी शिक्षक आमदार बाळाराम पाटील, आमदार प्रवीण स्वामी, माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, राष्ट्रीय बहुजन शिक्षक महासंघाचे राज्याध्यख अनिल नाचपल्ले, महिला राज्याध्यक्षा रेखाताई सुडे, राज्य सरचिटणीस संतोष भोजने यांची उपस्थिती होती. या पुरस्काराबद्दल संगीता गोमारे यांचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, दयानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार धिरज विलासराव देशमुख, संस्थेचे सचिव श्याम देशमुख, मुख्याध्यापक शिंदे सर्व शिक्षक यांनी कौतुक करून अभिनंदन केले.
















