22.6 C
Latur
Sunday, December 14, 2025
Homeमहाराष्ट्रसंत्र्यांच्या दरात वाढ; बाजारपेठेत आवक घटली

संत्र्यांच्या दरात वाढ; बाजारपेठेत आवक घटली

मुंबई : प्रतिनिधी
एपीएमसीतील फळ बाजारात नोव्हेंबर महिन्यात संत्र्यांची आवक वाढते. मात्र ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका नागपूरसह विदर्भातील संत्री उत्पादकांना बसला आहे. पावसामुळे झाडांवरील फळे गळून पडल्याने शेतक-यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. परिणामी, मुंबईच्या बाजारात संर्त्याची आवक घटल्याने दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दरदिवशी ४० ते ५० ट्रक संत्री बाजारात येत होती. आता केवळ १० ते १२ ट्रक संत्री आवक होत आहे. आवक घटल्याने दरात वाढ झाली आहे. आकारमानानुसार घाऊक बाजारात संर्त्याचे दर आहेत.

पावसामुळे मालाचा दर्जाही घसरला
पावसामुळे संर्त्यांचा दर्जा खालावला असून फळांवर डाग पडले आहेत. त्यामुळे विक्रीयोग्य माल कमी उपलब्ध असल्याने बाजारात दर वाढल्याचे व्यापा-यांनी सांगितले. सध्या मुंबई एपीएमसी फळ बाजारात नोव्हेंबरच्या अखेरीस राजस्थानमधून संत्री येण्यास सुरुवात होईल. परंतु यंदा संर्त्याचे दर पाहता बाजार भावानुसार राजस्थानच्या संत्र्यांनाही चढा दर मिळण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR