छ. संभाजीनगर : संभाजीनगरमध्ये एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोटमध्ये भाजपाच्या आमदाराचे नाव लिहिल्याने खळबळ माजली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
जयदत्त सुरभेये नावाच्या तरुणाने आत्महत्या केली असून, त्याने सुसाईड नोटमध्ये भाजपाचे आमदार नारायण कुचे यांचे नाव लिहिले आहे. नारायण कुचे यांच्या धमक्यांमुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख या सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे.
या तरुणाने कुचे यांच्या जय भवानी बँकेकडून दोन लाखांचे कर्ज घेतले होते. त्यामुळे सुसाईड नोटमध्ये नारायण कुचे यांचे नाव असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली जात आहे.