लातूर : प्रतिनिधी
संभाजी सेनेच्या वतीने लातूर शहरातील मिनी मार्केट या ठिकाणी शेतक-यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, पिकांच्या नुकसान भरपाई पोटी शेतक-यांना सरसकट एकरी ५० हजार रुपयाची मदत द्यावी, या मागणीसाठी संभाजी सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष प्रसाद पवार यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतक-यांच्या पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. नदीकाठच्या जमिनी पिकासकट वाहून गेले आहेत. काही शेतक-यांची जनावरांची हानी झाली आहे, अशा बिकट परिस्थितीत सुद्धा सरकार शेतक-यांना एक प्रकारे शेतक-यांचा अपमान करत आहे. अशा संकटकालीन परिस्थितीत बळीराजाच्या पाठीमागे सरकारने खंबीर उभे राहून शेतक-यांची संपूर्ण कर्जमाफी केली पाहिजे, पिकांच्या नुकसान भरपाई पोटी शेतक-यांना सरसकट एकरी ५० हजार रुपयाची मदत करावी. त्याचप्रमाणे ज्यांच्या जनावरांची हानी झाली आहे.
अशा शेतकरी बांधवांना १ लाख ५० हजार रुपयाची मदत सरकारने तात्काळ केली पाहिजे. या मागण्यासाठी संभाजी सेनेच्या लातूर तालुक्याच्या वतीने शहरातील मिनी मार्केट येथे रस्ता रोको आंदोलन करून लातूर तहसीलदार यांना मागण्याची निवेदन दिले. सदर मागण्या येत्या आठ दिवसात पूर्ण नाही झाल्या तर संभाजी सेना यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला.
या आंदोलनात संभाजी सेनेचे प्रसाद पवार, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अमोल कांदे, हनुमंत बारलेकर, सिद्धाजी माने, रितेश चव्हाण, उमाकांत वायाळ, वैभव विभुते, किरण मुक्तापुरे, वैभव विभुते, बालाजी गायकवाड, केशव कदम, श्रावण बनसोडे, अमजद पठाण, आमो पठाण, टपरीज पठाण, समशु भैया, विकास शिरसागर, महेश शिरूरकर, अमित मळगे, नागेश सूर्यवंशी, अक्षय नाईक, सुजल सुडे, अनिकेत जोशी, अभिषेक बोराडे, अनिकेत चव्हाण, दीपक मुंडे, किरण लहाने, पवन लहान, अजय बाबळे, अजय शिंदे, गणेश कामटे, दीपक बोराडे, सुजित बोराडे, विशाल कापसे, ओम कदम, विजय बोराडे, रोहित दोडके, ऋषी दोडके, अतुल गंभीरे, ओमकार पांचाळ, सुशांत राठोड, राम पांचाळ, ऋषिकेश हांडे, राहुल कांबळे, पृथ्वीराज चव्हाण, वैभव तोंडे, सुशांत पडले, कृष्णा आगलावे, रोहित काळे, शुभम पाटील, तेजस पांचाळ, प्रेम काकडे, अवधूत कुलकर्णी, ऋषिकेश मुंगळे आधी अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

