Homeलातूरसकाळी ९.३० वाजता ईद-उल-फित्रची नमाज

सकाळी ९.३० वाजता ईद-उल-फित्रची नमाज

लातूर : यंदा १९ फेबु्रवारी रोजी पवित्र रमजान महिन्यास प्रारंभ झाला होता. संपूर्ण महिना रोजा (उपवास), नमाज, ईबादतमध्ये मुस्लिम बांधव राहिले. दि. २० मार्च रोजी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने आज दि. २१ मार्च रोजी रमजान ईद (ईद-उल-फित्र) साजरी केली जाणार आहे. आज सकाळी ९ वाजता येथील ईदगावर मुफ्ती ओवेस यांचे ईदच्या संदर्भाने बयान(प्रवचन) होईल. त्यानंतर ९.३० वाजता त्यांच्या मागे ईदची सामुहीक नमाज होणार आहे. तसेच जे मुस्लिम बांधव ईदगावर पोहोंचू शकत नाहीत, अशा वृद्धांसाठी व लहान मुलांसाठी शहरातील विविध मस्जिदांमधूनही ईदची नमाज आयोजित करण्यात आलेली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR