सचिन वाझे, प्रदीप शर्मासह १० जणांवर आरोप निश्चित

अ‍ँटिलियासमोर स्फोटके, हिरेन हत्या प्रकरणी चालणार खटला
मुंबई : प्रतिनिधी
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याच्या आणि उद्योगपती मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या बहुचर्चित प्रकरणात मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने मोठा निर्णय घेत बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह एकूण १० आरोपींविरोधात अखेर ५ वर्षांनंतर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

आरोप निश्चित झाल्यामुळे या हायप्रोफाइल प्रकरणाच्या प्रत्यक्ष सुनावणीचा आणि खटल्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सर्व आरोपींविरुद्ध बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा (यूएपीए) आणि भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध गंभीर कलमांखाली खटला चालवला जाणार आहे. २५ फेब्रुवारी २०२१ रोजी दक्षिण मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर बेवारस सोडलेली एक संशयित स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. या गाडीत जिलेटिनच्या २० कांड्या आणि धमकीचे पत्र सापडले होते.

त्यानंतर अवघ्या काही दिवसांत म्हणजेच ५ मार्च २०२१ रोजी या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत रहस्यमय परिस्थितीत आढळून आला. मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझे आणि त्यांच्या सहका-यांनीच केल्याचा गंभीर आरोप हिरेन यांच्या कुटुंबीयांनी केला होता. गेल्या ५ वर्षांपासून या प्रकरणात डिस्चार्ज अर्ज आणि विविध याचिकांमुळे आरोप निश्चितीची प्रक्रिया प्रलंबित होती. मात्र, आता एनआयए न्यायालयाने आरोपींवर अधिकृतपणे यूएपीए आणि हत्येशी संबंधित कलमांखाली दोषारोप निश्चित केल्याने साक्षीदारांची साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होऊन खटल्याची सुनावणी वेगाने पार पडणार आहे.

एटीएसकडून
एनआयएकडे तपास
सुरुवातीला या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे होता. मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाने हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला. तपासादरम्यान एनआयएने कारवाई करत खालील आरोपींना अटक केली.

१० जणांना केली होती अटक
एन्काउंटर स्पेशालिस्ट आणि मुख्य सूत्रधार म्हणून सचिन वाझेला अटक केली. तसेच एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मालाही याच प्रकरणावरून अटक केली होती. यासोबतच विनायक शिंदे, नरेश गोर, रियाझुद्दीन काझी यांच्यासह एकूण १० जणांना अटक करण्यात आली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21

Latest news