31.1 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeलातूरसत्ताधारी आमदार लोकप्रतिनिधी नव्हे तर  ‘ठेकेदार’ झाले आहेत : आमदार अमित देशमुख 

सत्ताधारी आमदार लोकप्रतिनिधी नव्हे तर  ‘ठेकेदार’ झाले आहेत : आमदार अमित देशमुख 

रेणापूर : प्रतिनिधी
सत्ताधारी भाजप आणि महायुतीतील लोकप्रतिनिधींना आता सामान्य माणसाच्या प्रश्नांशी काहीही देणे-घेणे राहिलेले नाही. हे लोक आता लोकप्रतिनिधी न राहता ‘ठेकेदार’ झाले असून, कमिशन आणि टक्केवारी हाच त्यांचा मुख्य उद्देश बनला आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, अशा कडक शब्दांत माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
लातुर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ निमित्ताने माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शेख अब्दुल करीमसाब यांच्या अध्यक्षतेखाली दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी रेणापूर तालुक्यातील खरोळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस आघाडी लातूर जिल्हा परिषद आणि रेणापूर पंचायत समिती निवडणुकीतील काँग्रेस आघाडी उमेदवार  रेणापूर तालुक्यातील, खरोळा जिल्हा परिषद गटातील उमेदवार सौ. रूपाली विलास भोसले, खरोळा पंचायत समिती गणातील उमेदवार सौ. दैवशाला संजय राऊतराव, व कारेपूर पंचायत समिती गणातील उमेदवार सौ. संगीता बालाजी काळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत माजी मंत्री, आमदार अमित देशमुख बोलत होते.
काँग्रेस पक्षाचा विचार ध्येय, धोरण, नेत्यांचे आणि जनतेचे सहकार्य, उपकार याची जाणीव न ठेवता केवळ स्वार्थासाठी इकडून तिकडे उड्या मारणारे माजी आमदार आणि त्या प्रवृत्तीच्या लोकांनाही या निवडणुकीतुन जनतेने धडा शिकवावा असे आवाहन करुन माजी मंत्री, आमदार अमित देशमुख पुढे म्हणाले, महाविकास आघाडी काळात सांस्कृतिक कार्य मंत्री असताना मुंबईतील इंदू मिल स्मारकाप्रमाणे पानगावच्या परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास विभागीय स्मारकाचा दर्जा दिला व आवश्यक निधी देऊन कामास सुरुवात केली तसेच महाविकास आघाडी काळात वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना ७०-३० कोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे आज राज्याच्या तुलनेत लातूरचे सर्वाधिक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत त्यांना या निर्णयाचा फायदा होत आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले.
रेणापूर तालुका लातूर जिल्ह्यात आल्यापासून लहान भाऊ म्हणून या तालुक्यासाठी प्रत्येक योजना राबवली, साखर कारखाना, रेणा प्रकल्प, बराज  उभारून ग्रामीण भागात क्रांती घडवली. मी पालकमंत्री असतानाही लातूर ग्रामीण मतदार संघाला झुकते माप दिले. ही विकास प्रक्रिया आपणाला यापुढेही गतिमान ठेवायचे आहे. लातूर जिल्हा परिषद आणि रेणापूर पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक, गतिमान प्रशासन आणायचे आहे. त्यासाठी, काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन ही शेवटी आमदार देशमुख यांनी केले.
दरम्यान या जाहीर प्रचार सभेत धनंजय देशमुख, विलास भोसले, यशवंतराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करीत काँग्रेस आघाडीच्या सर्व उमेदवाराना बहुमतांनी विजयी आपल्या सेवेची संधी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती केली. यावेळी समद पटेल, सर्जेराव मोरे, प्रमोद जाधव, शिवराज सप्ताळ, प्रदीप राठोड, संजय राऊतराव, प्रशांत माने, प्रवीण माने, श्रीखंडी हरवाडीकर, दुर्गाप्रसाद मोटे, विश्वासराव देशमुख, लालासाहेब चव्हाण, बालाजी कदम, गजेंद्र चव्हाण यांच्यासह खरोळा जिल्हा परिषद गट व गण यासह कारेपुर पंचायत समिती गणातील मतदार बंधू, भगिनी, काँग्रेस आघाडिचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, परीसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR