20.7 C
Latur
Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्रसत्तास्थापनेपूर्वीच महायुतीत जुंपली

सत्तास्थापनेपूर्वीच महायुतीत जुंपली

शिवसेना-राष्ट्रवादीत शाब्दिक वॉर

मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार महेंद्र थोरवे यांनी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी गद्दारी केली असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्याला आता सुनील तटकरे यांच्या कन्या आणि श्रीवर्धनच्या आमदार आदिती तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यश मिळाल्याची हवा डोक्यात जाऊ देऊ नका, यश नम्रतेने स्वीकारायला हवे. मी ८३ हजार मताधिक्याने निवडून आले आहे. पण या यशाचा स्वीकार आम्ही नम्रतेने करत आहोत, असा सल्ला आदिती तटकरे यांनी महेंद्र थोरवे यांना दिला आहे.

दरम्यान, कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर आरोप लावले होते. विजयानंतर बोलताना आमदार महेंद्र थोरवे म्हणाले होते की, माझा पराभव करण्यासाठी अनेक अदृश्य शक्ती कार्यरत होत्या. महायुतीत असूनही त्यांनी मला पाडण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. परंतु त्यांचा हा डाव माझ्या निष्ठावंत शिवसैनिकांनी उलटवला. माझा विजय झाला आणि माझ्या मतदारसंघातून सुनील तटकरे यांचा पराभव झाला.

थोरवे यांच्या विधानाचा समाचार घेत आदिती तटकरे म्हणाल्या, महेंद्र थोरवे काठावर वाचले. मी त्यांना फारसे महत्त्व देत नाही. त्यांनी त्यांचा मतदारसंघ सांभाळावा. यश मिळाल्याची हवा डोक्यात जाऊ देऊ नये. यश नम्रतेने स्वीकारायला हवे. मी ८३ हजार मताधिक्याने निवडून आली आहे. पण या यशाचा स्वीकार आम्ही नम्रतेने करत आहोत.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. या यशानंतर सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्याचवेळी महायुतीमधील खदखद बाहेर येत आहे. महायुतीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक वॉर सुरू झाले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद चर्चेत आला आहे.

कुठला मंत्री होणार हे पक्षश्रेष्ठी ठरविणार
आदिती तटकरे पुढे म्हणाल्या, यश किती डोक्यात जाऊ द्यायचे हे ज्यांनी त्यांनी ठरवायचे आहे. राज्यात आता महायुतीचे सरकार येत आहे. आमच्या पक्षातून कोण कुठला मंत्री होणार हे आमच्या पक्षाचे नेते ठरवणार आहेत. स्थानिक आमदार हे ठरवत नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR