लातूर : प्रतिनिधी
साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्त समतावादी सांस्कृतिक चळवळ जिल्हा शाखा लातूरच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धेतून लातूरचा सर्वोत्कृष्ट वक्ता म्हणून येथील मारवाडी राजस्थान विद्यालयाची अदिती गोविंद मुस्कावाड प्रथम आल्याने तिची निवड करण्यात आली.
राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या व्ही.एल.सी.सभागृहात दि. २ ऑगस्ट रोजी समतावादी सांस्कृतिक चळवळीचे प्रदेशाध्यक्ष प्राचार्य डॉ. माधवराव गादेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रा. संभाजी पाटील, शुभम बावणे, प्रकाश घादगीने, बी. पी.सुर्यवंशी यांच्या हस्ते प्रथम आलेली अदिती मुस्कावाड, द्वितीय स्वरा राहुल शिंदे (देशीकेंद्र विद्यालय लातूर ) तृतीय भक्ती संजय गरड (केशवराज विद्यालय लातूर ) विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम स्मृतीचिन्ह पुष्पहार व आकर्षक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
साहित्यिक प्रा. रामकिशन समुखराव, वंदना गादेकर व सीता पारधे यांनी परीक्षक म्हणून काम पाहीले.
प्रास्ताविक व सुत्र संचालन समतावादी सांस्कृतिक चळवळीचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे यांनी केले. आभार सचिव अशोक तोगरे यांनी मानले. यावेळी शिवाजी गायकवाड, व्यंकट सरवदे, संतोष गादेकर, राजकुमार शिंदे, खंडू बनसोडे, ज्योती तेलंगे, पांडूरंग मोरे, छगन गायकवाड, एम. डी. पोतदार, माधव तोंडारकर आदीसह विद्यार्थी पालक मार्गदर्शक शिक्षक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

